Monday, July 4, 2016

मुंबई शहर आणि उपनगरांना भरतीचा धोका

मुंबई शहर आणि उपनगरांना भरतीचा धोका

मुंबई शहर आणि उपनगरांना पावसाने रविवारी (ता. 3) सलग पाचव्या दिवशी झोडपले. दुपारपर्यंत सरींवर कोसळणाऱ्या पावसाने सायंकाळनंतर तुफानी बॅटिंग केली. बुधवारपर्यंत (ता. 6) पावसाचा जोर कायम राहणार आहे. सोमवारी (ता. 4) दुपारी 12 वाजता समुद्रात भरतीची वेळ असून या काळात जोरदार पाऊस पडल्यास शहर जलमय होण्याची भीती आहे.

सोमवारी दुपारी 12.24 वाजता मोठी भरती आहे. समुद्रात 4.72 मीटर एवढ्या मोठ्या उंचीच्या लाटा निर्माण होणार आहेत. त्यामुळे भरतीच्या काळात जोरदार पाऊस झाल्यास मुंबईत पाणी तुंबण्याचा धोका आहे.
रविवारी मुंबई शहरात 11.53 मि.मी., पूर्व उपनगरांत 16.34 मिमी. आणि पश्‍चिम उपनगरांत 18.29 मि.मी. पावसाची नोंद झाली.

तलावक्षेत्रात जोरदार
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या क्षेत्रातही जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे तलावांच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.

यंत्रणांना खबरदारीच्या सूचना
येत्या 24 ते 48 तासांतही अनेक भागांत अधूनमधून पावसाच्या सरी कोसळतील, काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल. मुंबई आणि उपनगरांत पावसाचा जोर 6 जुलैपर्यंत कायम राहणार आहे. या दिवसांत महापालिका प्रशासनाने भरतीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे भरतीच्या वेळांनुसार आवश्‍यक खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिले आहेत,‘ अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक के. एस. होसाळीकर यांनी दिली.

वसई विरार महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन

  • टोल फ्री क्रमांक : 18002334353
  • पोलीस स्थानक : १००
  • अग्निशमन विभाग : १०१ / ०२५०-२४०२१०५
  • वैद्कीय मदत : १०८
  • ठाणे जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७
जिल्हाधिकारी कार्यालय ०२५२५-२५३१११
पालघर पोलीस ०२५२५-२५११०

Labels: , , , , ,

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home