Friday, July 1, 2016

पालघर, नालासोपारा, वसई, विरार,बोईसर येथील सोनसाखळी चोर वाडा येथे स्नॅचर अटकेत

पालघर : येथील महिलेच्या गळयातील दागिने चोरी प्रकरणातील (चेन स्रॅचिंग) दोन आरोपींना वाडा येथे पकडण्यात पालघरच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला यश आले असून या यामुळे पालघर मधील स्नॅचींगचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

जिल्हयातील पालघर, नालासोपारा, वसई, विरार व बोईसर इ. शहरातील महिलांच्या गळयातील दागिने हिसकावून दुचाकीवरुन पळून (चैन स्रॅचिंग) जाण्याच्या प्रकारात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले होते. धूम स्टाईलने येऊन दागिने चोरणाऱ्यांना अटक करण्यात स्थानिक पोलीस अपयशी ठरू लागल्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक शारदा राऊत यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अशोक होनमाने यांच्या टीमकडे या बाबतची जबाबदारी सोपविली होती.

याप्रकरणात प्रकाश दशरथ धानवा (२०) रा. वाडा व मिलींद शंकर धानवा (१९ ) रा. वाडा या आरोपीना अटक करून त्यांच्याकडून मंगळसूत्रे, बोरमाळ, चेन असे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे आहे. चौकशीमध्ये आरोपींचा १९ चेन स्रॅचिंगमध्ये सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे. या कामगिरीत सहा. पो. नि. प्रशांत लांगी, पो. उप. नि. हितेंद्र विचारे, सचिन चव्हाण, महादेव वेदपाठक, शिवानंद सुतनासे, हवालदार प्रदिप पवार, संदीप मोकल, मंगेश चव्हाण, शंकर दळवी, मनोज मोरे, सचीन दोरकर, प्रवीण पाटील इ. अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. यामुळे आता अन्य ठिकाणी झालेल्या अशाच प्रकारच्या गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होण्याची शक्यता या पथकाने वर्तविली आहे. (प्रतिनिधी)

>१९ गुन्हे आले उघडकीस
आरोपींनी विरार पोलीस स्थानकांतर्गत सात, तुळींज पोलीस स्थानकांतर्गत सात, अर्नाळा पोलीस स्थानकांतर्गत दोन, पालघर पोलीस स्थानकांतर्गत दोन तर डहाणू तालुक्यातील एक गुन्हा उघडकीस आला आहे.
आरोपी कडून ११ लाख ११ हजार ४६५ रूपयांच्या सोन्याच्या दागिन्यांसह गुन्हयासाठी वापरलेली मोटर सायकल देखील पोलीसांनी जप्त केली आहे. तपासाअंती आणखीही मुद्देमाल हाती लागण्याची शक्यता आहे.

Labels: , , , , , ,

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home