Thursday, July 21, 2016

डहाणू येथील खंडणीखोरांना १0 तासांत अटक

 खंडणीखोरांना १0 तासांत अटक
 हितेन नाईक ■ पालघर

डहाणू येथील नहर या ज्वेलर्सच्या घरातून त्याच्या १२ वर्षीय दिया या मुलीचे पाच कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करणार्‍या पाच आरोपींना बुधवारी पोलिसांनी नवली फाटका जवळच्या एका कॉम्प्लेक्समधून अवघ्या दहा तासात अटक केली. यात एका महिलेचाही समावेश आहे. ही माहिती पोलीस आधिक्षिका शारदा राऊत यांनी दिली.
डहाणू येथे सचिन नहार याचे रमेश ज्वेलर्स हे दुकान असून ते डहाणू (मसोली) येथे रहातात. त्यांच्या घरात सर्व झोपले असतांना त्यांच्या दुकानात सहा वर्षा पूर्वी घरकाम करणारा शिवा भगत याने आपल्या चार साथीदारासह मंगळवारी रात्नी सुमारे दीड वाजता बाथरूमच्या खिडकीच्या काचा काढून घरात प्रवेश केला. बाजूच्या खोलीत झोपलेल्या दिया हिच्या तोंडात ओढणी कोंबून व चाकू दाखवून'ओरडलीस तर तुझे तुकडे तुकडे करीन असा दम दिला.' तिला उचलून तिच्याच स्कूटीवर बसवून दोन आरोपी पालघरच्या दिशेने निघाले. यावेळी दियाच्या डोळ्यांवर पट्टी बांधून तिच्या गळ्यावर चाकू ठेवण्यात आला होता. पहाटे भर पावसात तिला पालघरच्या नवली फाटका जवळील क्वीन पॅलेस कॉम्प्लेक्स येथील आरोपीच्या घरात आणून बाथरूममध्ये कोंडून ठेवले.
दिया जवळ झोपलेल्या पाच वर्षाच्या तिच्या भावाने पहाटे रडत शेजारच्या खोलीत जाऊन आईला दिया नसल्याचे सांगितले. त्यानंतर डहाणू पोलीस स्टेशनमध्ये दिया बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. तिची सर्वत्न शोधा शोध सुरु असताना सकाळी ६.४५ वाजता दियाच्या आईच्या मोबाईल वर एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला.दिया आमच्या ताब्यात असून पाच कोटी तात्काळ द्या,अन्यथा तिला ठार करण्यात येईल असे सांगण्यात आले. नंतर मुख्य आरोपी भगत हा सफाळे, वाणगाव येथून आपले ठिकाण बदलून मोबाईलद्वारे फोन करीत होता. या वेळी संभाषणा दरम्यान खंडणी मागताना आपल्याला हा आवाज ओळखीचा वाटत असल्याचे तिने आपल्या पतीला सांगितले आणि आपल्याकडे काम करणार्‍या शिवा भगतचा आवाज असल्याची खात्नी झाल्या नंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.
हे प्रकरण ५कोटींच्या खंडणीचे असल्याचे समजल्यावर डहाणू उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन पांडकर, पालघर चे उपविभागीय पोलीस अधिकारी जयंत बजबळे स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.अशोक होनमाने, डहाणू चे पो.नि. शेखर डोंबे,पालघर चे पो.नि. संजय हजारे,सफाळे पोलीस स्टेशन चे सहा.पो.नि.मानसिंग पाटील, पीएसआय जय पाटील, हितेंद्र विचारे, किशोर सांगळे, धनुराम पाटील इत्यादीची सात पथके तैनात करण्यात आली होती.
त्यांनी अचूक व्यूहरचनेच्या आधारे मुख्य आरोपीला स्टेशन बाहेर अटक केली. या वेळी पोलिसांनी त्याच्या घरात प्रवेश केला त्यावेळी घरात अन्य आरोपी पैकी लक्ष्मण आनंदू भगत (३५), कृष्ण कुमार राम आशिष राम (१९ ) पिंकू भिकू तांडेल मुख्य आरोपीची दुसरी पत्नी(२४) रा.वलसाड,यांच्या सह एका अन्य आरोपीला पोलिसांनी अटक केली. अवघ्या दहा तासात आपल्या मुलीची सुखरूप पणे सुटका केल्याने सचिन नहार व त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांचे मनापासून आभार मानले.
आरोपी हा पालघरमधील सूरज मल्होत्ना यांच्या गुरु कृपा कॅटरिंग मध्ये अनेक वर्षा पासून काम करीत असल्याची माहिती मिळाल्या नंतर पोलिसांनी सूरजला सहकार्य करण्याची विनंती केली आणि तो राहत असलेल्या क्वीन पॅलेसमध्ये त्याला पाठवले. सूरजने शिवाला हाक मारली. दरवाजाच्या की-होलमधून शिवाने त्याला पहिले व मागच्या दारातून पलायन करून त्याने पालघर स्टेशन गाठले. तिथे सूरज पोलिसांसोबत येत असल्याचे पाहून त्याने सूरजला फोन करून फोन का केल्याचे विचारले. आपल्याला अर्जंट ऑर्डर आल्याने तुझी गरज असल्याचे त्याने सांगितले. मात्न आरोपीला संशय आल्याने त्याने पळ काढला.

Labels:

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home