Monday, July 18, 2016

कॅथॉलिक बँक सातिवली येथे ५0 व्या शाखेचे उद्घाटन

कॅथॉलिक बँक सातिवली येथे ५0 व्या शाखेचे उद्घाटन
वसई : एका धर्मगुरूंच्या पुढाकाराने सुरू झालेल्या बॅसीन कॅथॉलिक को.ऑप.बँकेला नैतिक मूल्यांचे अधिष्ठान आहे. त्यामुळे बँकेला आपल्या विकासात अडचण येणार नाही, असे उद्गार महाराष्ट्र शासनाच्या सेवा विभागाचे प्रधान सचिव आणि पालघर जिल्हा नियोजन समितीचे सचिव मुकेश खुल्लर यांनी वसई पूर्वेकडील सातिवली येथे बँकेच्या ५0 व्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलताना काढले.
कार्यक्रमास उद्घाटक म्हणून माजी आमदार डॉमणिक घोन्सालवीस आणि प्रमुख पाहूणो म्हणून इंडस्ट्रीअल इंजिनियरींग सिंडीकेटचे व्यवस्थापकीय संचालक चेतन शहा आणि गोवालीज इंडस्ट्रीअल असोशिएशनचे अध्यक्ष अशोक ग्रोवर उपस्थित होते. बँकेच्या नवीन शाखेचा अशिर्वाद निधी चुळणे येथील फातिमा माता चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर ग्रेग परेरा यांच्या हस्ते पार पडला.
बँक सुरक्षित हातात आहे. बँक ग्राहकांना चांगली सेवा देऊन आपले पंधरा हजार कोटीचे उदिष्ट साध्य करू शकेल. बँकेच्या कारभारात पारदर्शकता आहे, असेही खुल्लर यांनी आपल्या भाषणात सांगितले.
बॅसीन कॅथॉलिक बँक ही देशतील नागरी सहकारी बँकांत १0व्या क्रमांकाची शेडयूल्ड बँक आहे. १९१८ साली तत्कालीन वसईतील समाजाच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी सुरू झालेल्या पतपेढीचे १९६८ साली बँकेत रूपांतर झाले आणि १९९0साली बँकेला शेडयूल्ड दर्जा प्राप्त झाला. १९६0 साली बँकेची पहिली शाखा बंगली येथे सुरू झाली.
आता महाराष्ट्राच्या सहा जिल्ह्यात बँकेच्या ५0 शाखा असून बँकेला विकास दर १३ टे आहे. बँक ७000 कोटी रूपयाचा मिश्र व्यवसाय करीत आहे, अशी माहिती बँकेच्या प्रमुख महाव्यवस्थापिका श्रीमती ब्रिजदिना कुटिन्हो यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली.
बँक कोणत्याही धर्माची किंवा राजकीय पक्षाची नाही, ती सर्वांची बँक आहे. औद्योगिक क्रांतिसाठी पोषक वातावरण ही बँक तयार करीत आहे. या बँकेतील ठेवी शेतकरी, कामगार यांच्या असून त्या संपूर्ण सुरक्षित आहेत, अशी ग्वाही बँकेचे चेअरमन मायकल फुटर्य़ाडो यांनी आपल्या भाषणात दिली.
बँकेचे महाव्यवस्थापक आग्नेलो पेन आणि सहकारी क्षेत्रातील कार्यकर्ते यशवंत पाटील , साधना पतपेढीचे चेअरमन आणि गोवालीज इंडस्ट्रीअल असोशिएशनचे उपाध्यक्ष अशोक कुलास यांचीही यावेळी भाषणे झाली. बँकेने आपल्या शतक महोत्सवाच्या निमित्ताने झाडे लावण्याचा उपक्रम हाती घ्यावा. आपल्या सर्व सभासदांस झाडे लावण्यास प्रोत्साहन द्यावे. सेवानवृत्त लोकांना अधिक व्याज द्यावे, असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉमणिक घोन्सालवीस आपल्या भाषणात केले. उपस्थित पाहुण्यांची ओळख व्हाईस चेअरमन ख्रिस्तोफर रॉड्रीग्ज यांनी करून दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मालकम कोलासो यांनी केले. आभार प्रदर्शन संचालिका श्रीमती ट्रिझा परेरा यांनी केले. कार्यक्रमास वसई विभागीय प्रांत ऑफिसर डॉ.दादाराव दातकर, वसईचे तहसिलदार गजेंद्र पाटोळे यांच्या सह वसई पूर्वेकडील उद्योजक मोठया संखेने उपस्थित होते.
(वार्ताहर) व्याज कमी करावे! आर्थिक मंदी असताना ही बँक आव्हान स्विकारून पुढे जात आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. ग्राहक या नात्याने बँकेकडून आम्हास चांगली सेवा मिळते. बँकेने विकासासाठी कर्जावील व्याजदर कमी करण्याची आवश्यकता आहे, असे मत प्रमुख पाहुणो चेतन शहा यांनी यावेळी बोलताना मांडले. वसई पूर्वेकडील औद्योगिक विकासात बँकेचा वाटा मोठा आहे, असे प्रतिपादन दुसरे पाहुणो अशोक ग्रोवर आपल्या भाषणात केले.

Labels: ,

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home