Thursday, June 30, 2016

सुशिक्षित बेरोजगारांना आवाहन

सुशिक्षित बेरोजगारांना आवाहन

पालघर : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे या कार्यालयात सुशिक्षित बेरोजगारांची व आर्थिक सहाय्य भाग अंतर्गत काम केलेल्या पदवीधर अंशकालिन उमेदवारांची माहिती अद्यायावत करण्यात येत आहे. यापूर्वी भाग-अ अंतर्गत नाव नोंदणी केलेल्या पालघर व ठाणे जिल्ह्यातील अंशकालिन सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,ठाणे या कार्यालयास दि.११ जुलै २0१६ पर्यंत सकाळी ११.00 ते ५.00 वाजेपर्यंत अंशकालिन कर्मचारी म्हणून अनुभवाचे मुळ प्रमाणपत्न, स्वत:च्या पासपोर्ट आकाराच्या छायाचित्नासह तसेच सद्यस्थितीत नोकरी करीत असल्यास अनुभवाच्या दाखल्यासह शपथपत्न सादर करणे आवश्यक आहे.  ही माहिती कालर्मयादेत असून ती शासनास पाठवायची असल्याने प्राधान्याने वरील कार्यालयात उपस्थित राहून माहिती द्यावी. मुदतीनंतर येणा-या माहितीची , तक्र ारीची दखल घेतली जाणार नाही, असे प्रभारी सहाय्यक संचालक, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे यांनी कळविले आहे.

maharojgar.gov.in या साईटवर अक्षरश: काही मिनिटात नाव नोंदणी करता येते, त्यासाठी पैसे लागत नाहीत. नाव नोंदणी झाल्यावर उमेदवारास मोबाईलवर नोंदणी क्रमांक व इतर आवश्यक माहिती एसएमएसद्वारे येते. या व्यक्तीस सदरहू वेबसाईटवरील होम पेजवर उपलब्ध नोकऱ्यांची अद्ययावत माहिती रोजच्या रोज पहायला मिळते. याशिवाय 18602330133 या हेल्पलाईन क्रमांकावर देखील सर्व मदत केली जाते. नोकरीच्या नाव नोंदणीसाठी कोणीही कोणालाही पैसे देऊ नयेत.

या वेबसाईटवर ३५ हजारपेक्षा जास्त नोकरी देणाऱ्या संस्था, कंपन्या तसेच शासकीय विभागांची नोंदणी असून या साईटच्या माध्यमातूनच ते आवश्यकतेप्रमाणे नोकऱ्यांसाठी कॉल्स देतात त्यामुळे या साइट्स नियमित पाहणे गरजेचे आहे.

Labels: , , ,

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home