Sunday, June 26, 2016

पालघर जिल्हय़ाला मुसळधारांनी झोडपले

 पालघर जिल्हय़ाला मुसळधारांनी झोडपले

शेतीच्या कामांना वेग : बळीराजा सुखावला, शहरवासीयांची तारांबळ, अनेक रस्ते जलमय, वीज झाली खंडित

जव्हारमध्ये संततधार, जिल्हात तुफानी पाऊस, अनेक झाडे पडली, घरांची पडझड , पहिल्याच पावसात नालासोपारा जलमय , सततच्या पावसामुळे मनोरचे जनजीवन विस्कळीत

लोकमत चमू■ पालघर

पंधरवड्यापासून हुलकावणी देणार्‍या पावसाने आज संपूर्ण पालघर जिल्ह्याला मुसळधारांनी झोडपून काढले. त्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. सर्वाधिक पाऊस पालघर तालुक्यात १४२.३ मी.मी. झाला. तर जिल्हयात आजच्या तारखेपर्यंत १४0.९ मि. मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीयाच तारखेपर्यंत सरासरी ५९३.८ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली होती. ७ जूनला आगमन होणार्‍या पावसाने दडी मारल्याने पेरणीसाठी थांबलेल्या शेतकर्‍यांची मोठी कुचंबणा झाली होती. मात्र पाऊस सुरू झाल्याने बळीराजा पेरणीची कामे हाती घेऊ शकला. संततधार कोसळणार्‍या पावसाने पेरणीच्या कामात काहीसे अडथळे आणले असून पेरणीची कामे खोळंबल्याचे दिसून येते. जिल्हयात पालघरमध्ये सर्वाधिक पाऊस पडला असून त्याच्या खालोखाल वसई व डहाणू तालुक्यात पावासाची नोंद झाली आहे. या उलट वाडा, जव्हार, विक्रमगड, तलासरी या पाणीटंचाई ग्रस्त व आदिवासी तालुक्यात मात्र पावसाचे प्रमाण कमी आहे.
गेल्या तीन दिवसापासून पाऊस पडत असून मनोर परिसरात पेरणीच्या कामाला वेगात सुरूवात केली आहे. पावासामुळे शेतकरी समाधानी झाल्याचे चित्र दिसत आहे. नांगरणी, पेरणी, शेतात पाणी साचविण्यासाठी खंड बांधणे घोंगडी ईरले तयार करणे अशी विविध काम जोमात सुरू केली आहेत. तर रोजगार सुरू झाल्याने शेतमजूरही आता खूष झाले आहेत.

तालुके २४ जून २0१६ २५ जून२0१६ एकुण २५ जून २0१५
वसई ११७.२ मि.मी. १0९.0 मि.मी. २२६.२ मि.मी ७७५.0 मि.मी
वाडा ८.६ मि.मी ४४.३ मि.मी ५२.९ मि.मी ४९४.१ मि.मी
डहाणू ६८.८ मि.मी ५१.१ मि.मी ११९.१ मि.मी ६0१.१ मि.मी
पालघर १४३.१ मि.मी १४२.३ मि.मी २८५.४ मि.मी ६६0.२ मि.मी
जव्हार ९.६ मि.मी १0.0 मि.मी १९.६ मि.मी ५२८.८ मि.मी
मोखाडा २.२ मि.मी १३.६ मि.मी १५.८ मि.मी ३६९.२ मि.मी
तलवाडा ११.८ मि.मी २२.५ मि.मी ३४.३ मि.मी ४00.0 मि.मी
विक्रमगड १३.८ मि.मी १७.८ मि.मी ३१.६ मि.मी ५१८.२ मि.मी
एकूण ६९.६ मि.मी ७१.३ मि.मी १४0.९ मि.मी ५९३.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home