Monday, June 27, 2016

जि.प. शाळांतील विद्यार्थ्यांची आबाळ निधी नाही : शिक्षकांनाच पुरवावा लागतो पोषण आहार

राहुल वाडेकर■ विक्रमगड
विक्रमगड तालुक्यात एकूण २३७ जिल्हा परिषद मराठी शाळा कार्यरत आहेत. त्यामध्ये जवळपास २४ हजारांच्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत असतात. विद्यार्थ्यांची गळती थांबली जावी,त्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि या प्रक्रियेतून विदयार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावला जावा,यासाठी शासनाकडून लाखो रुपये निधी दिला जातो. तसेच विद्यार्थ्यांची १00 टक्के पटनोंदणी करण्यासाठी शासनाकडून विदयार्थ्यांना गणवेश, पाठयपुस्तके व शाळेमध्ये पोषण आहराची व्यवस्था केली गेली आहे. मात्र शाळा सुरु होऊनही आज ११ दिवस उलटून गेले असतांनाही विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्यात आलेला नाही. सद्यस्थित शाळांवरील शिक्षण आपल्या खिशातून पदरमोड करुन साहित्य विकत आणून आहार देत आहेत.
परंतु हे किती दिवस चालणार शाळा सुरु होतांच पोषण आहाराची सामुग्री देणे आवश्यक होते. पण ते झालेले नाही. ज्या ठिकाणी केंद्र शाळा आहेत. त्यामध्ये पहिली ते ८ वी पर्यतच्या वर्गात जवळ जवळ ४00 ते ४५0 विदयार्थी असतात. एवढया मोठया विदयार्थ्यांना लागणार्‍या पोषण आहाराचेसाहित्य खरेदी करीतांना येथील शिक्षकांना मोठी करसरतच करावी लागते आहे. त्यातच शिक्षकांचे पगार महिन्याला वेळेत होत नसल्याची अडचण आहे. त्यामुळे रोज पोषण आहार पुरविण्यासाठी लागणारे साहित्य घेण्याकरीता शिक्षकांना उसनवारी करावी लागत आहे. ही संपूर्ण जबाबदारी येथील गट शिक्षणाधिकार्‍यांची असून त्यांनी पोषण आहार सामग्रीसाठी निधीची तरतूद करणे गरजेचे आहे.
मात्र ते सारी जबाबदारी शिक्षकांवर टाकून मोकळे झाले आहेत. त्यामुळे यामध्ये मरण होते ते शिक्षकांचे काही शाळा या खुप अडचणींच्या ठिकाणी व दुरवर असल्याने तेथे वाहतुकीची सोय नसल्याने तेथे े साहित्य नेणे देखील जिकिरीचे होत आहे. शाळेवर पोषण आहार पुरवितांना शिक्षकांना आपल्या खिशाला चाट द्यावी लागत असल्याने त्यांच्यामधून नाराजीचा सूर उमटत आहे. अदयापही शासनाने शाळांना निधी दिलेला नसल्याने विदयार्थ्यानां पोषण आहार पुरविण्याची जबाबदारी शिक्षकांवर आली आहे. अगोदर वेळेत पगार नाही व आता पोषण आहारासाठी पैसे तरी कुठून आणावयाचे हा प्रश्न आहे.
- संजय तुकाराम आयरे, नेते शिक्षक संघटना विक्रमगड.

Labels: , , , , , , , , ,

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home