Wednesday, June 29, 2016

२९ जुन २०१६

*नमस्कार*...🙏🏻
*आमची वसई स्थानिक समाचार*...!!!
२९/०६/२०१६
*१)* महापालिकेत पाण्याचे रिकामे माठ फोडणार-
 पाणी प्रश्नावर वसईतील महिला शिवसैनिक आक्रमक.

*२)* ग्रामपंचायतीने १९८१ मध्ये उभारलेली सोपारा बाजारपेठेतील दुमजली  धोकादायक इमारत आज पहाटे कोसळली..! सुदैवाने जीवितहानी टळली.

*३)* वसई मुळगांव येथे घरफोडी. ! दिड लाखांचा मुद्देमाल लांबविला; पोलिसांची तक्रार घेण्यास टाळाटाळ.

*४)* अनधिकृत बांधकाम अधिकृत दाखवून ग्राहकांची फसवणूक..! ञिमूर्ती कंस्ट्रक्शनवर कारवाईची मागणी.

*५)*महामार्गावरुन चोरून नेलेला कंटेनर पोलिसांच्या ताब्यात ४० लाखांचा माल पोलिसांनी केला हस्तगत.

*६)* *नालासोपारा* : समेळ पाडा येथील सोपारा गावात बंद पोस्ट ऑफिस ची इमारत पावसाने कोसळली. कोणतीही मनुष्य हानी नाही. वसई विरार महापालिकेच्या अग्नीशमन दलाने तातडीने घटना स्थळाला भेट दिली आणि मलबा हटवला..

*७)* *वसई* : पावसाच्या पुराचा धोका मिठागरतील कुटुंबांना. प्रशासनाचे दुर्लक्ष. 150 हुन अधिक कुटूंब पुराच्या सावटाखाली.

*८)* *वसई* : बवीआ नगरसेविका अनिता यादव यांचे अनधिकृत पक्ष कार्यालय अखेर पाडण्यात आले.

*९)* *वसई* : वसईत मुलींना पळवणारी टोळीतील एका आरोपीस पोलिसांची अटक. 2 मुलींची उत्तरप्रदेशातून केली सुटका. ह्यूमन ट्रॅफिकिंग चा पोलिसांचा संशय. वसई पोलीस करत आहेत अधिक तपास.

*१०)* *वसई* : पावसाच्या तडाख्याने वसईतील रस्यांनी तोडला दम. ठिकठिकाणी रस्ते उखडले. तर सर्वत्र खड्यांचे साम्राज्य. प्रशासनाने केली नाही रस्ते दुरुस्ती.

*११)* *वसई* : वसईतील स्कायवॉक बेवारस. ना सुरक्षा, ना स्वच्छता, गर्दुल्ले, भिकारी आणि जनावरांचा वावर.

*१२)* *नालासोपरा*: नालासोपारा हरवटे धानीव बाग येथे विहिरीत बुडून मुलाचा मृत्यू. पोहण्यासाठी मित्रांसोबत गेला होता.

टीम *JOIN* करण्यासाठी व नियमित अपडेट्स व वसई संबंधित बातम्यांसाठी आपले पूर्ण नाव व ठिकाण 9323395598 या आमची वसईच्या Whatsapp क्रमांकावर पाठवावे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home