Wednesday, June 29, 2016

डहाणूत शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट गावठी भातावर संकट

आता हवी उघडीप : वाडा, विक्रमगडमध्ये पेरण्यांना वेग, अनेक ठिकाणी विजेचा लपंडाव, झाडे पडल्याने संपर्क तुटला


तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून पाऊस कोसळत असून, नदी, नाले, गावतलाव भरभरून वाहू लागले आहेत. २६ जून २00२ च्या प्रलयाची आठवण करून देत २६ जूनला एकाच दिवशी चक्क २५१ मी.मीटर पाऊस पडला तर २७ जूनला सकाळी उघडीप देईल असे वाटत असतानाच दुपार पासून तुफान पावसाला सुरु वात झाली. मंगळवारच्या सकाळ पर्यंतच्या २४ तासात ११४.६ मी.मीटर पावसाची नोंद झाली तर आठवडा भरात ६५५.३ मी.मीटर, पाऊस पडला हा पाऊस धमणी धरण,कवडास बंधारा आणि साखरे बांधार्‍यात क्षेत्नातही पडल्यामुळे ते बर्‍यापैकी भरले आहे. 

सुरवातीलाच पाऊस सुरू होताच उतावीळ होऊन ज्या शेतकर्‍यांनी भाताचे बियाणे पेरले त्यांची मात्न या सतत पडणार्‍या पावसामुळे पंचाईत झाली आहे. पेरलेल्या भातावर कायमचे पाणी साचून राहिल्याने त्याचे कोंब कुजू लागले आहेत. तर काही दडपून गेले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांवर दुबार भात पेरणीचे संकट ओढावले आहे. या वर्षीही भातशेती वाया जाते की काय ? या चिंतेत शेतकरी सापडला आहे. अद्यापही वेधशाळेने दोन तीन दिवस असाच पाऊस कोसळेल असा इशारा दिल्याने बळीराजाची अवस्था आणखीज बिकट झाली आहे.
आज संध्याकाळी झालेल्या तुफानी पावसाने कंक्रडीपूल वाणगाव येथील डी.जे फॅक्टरी आणि वरोर येथील बंधारा रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद पडली त्यामुळे अनेक वाहने अडकून पडली होती. व स्थानिकांचेही प्रचंड हाल झाले. गेल्या काही दिवसांपासून रिमझिम बरसणार्‍या पावसाने शुक्रवार पासून धुवाँधार सुरवात केलेली असून सोमवार पर्यत जोरदार पडणार्‍या धो-धो पावसाने जव्हार शहराला चांगलेच झोडपल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्री पासून पडणार्‍या पावसाने थोडाही वेळ उघडीप दिलेली नसल्यामुळे नागरीक कंटाळून घराबाहेर निघालेले नाहीत. रस्ते ओस पडलेले आहे. या पावसामुळे शेतकर्‍यांना मात्र चांगला दिलासा मिळाला आहे. काही शेतकर्‍यांनी नांगरणी करण्यास सुरवातही केलेली आहे. धो-धो बरसणार्‍या पावसामुळे भक्कम बांधलेली स्लॅबची घरेही गळायला लागली आहेत, त्यातून ही पाण्याची धार सुरू आहे. तर खेडो पाड्यातील आदिवासींच्या कुडाच्या, पत्र्यांच्या, कौलाच्या घराचे काय हाल झाले असतील याची कल्पनाच केलेली बरी. जिकडे तिकडे नाले, नद्या, बंधारे भरून वाहू लागले आहेत. खेडोपाड्यातून येणार्‍या- जाणार्‍या रस्त्यांवर, मोर्‍यांवर ठिकठिकाणी पाणी साचल्याने काही खेडोपाड्यांचा संपर्क तुटला आहे. संततधार सुरू असल्याने शेतकरी ही दुविधेत पडले आहेत. शेतीसाठी पाऊस पाहिजे परंतु तो नियमीत असावा, अशा प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत. 
दरम्यान जव्हार शहर हे पर्यटन स्थळ असल्याने आणि पावसाळ्यात येथे दाभोसा, हिरडपाडा, काळमांडवी, खडखड, हनुमानपॉईंट, सनसेट पाँईंट, डॅम, जयविलास पॅलेस अशी विविध पर्यटन स्थळे असल्यामुळे पावसाळ्यात येथे असंख्य पर्यटकांची विविध पॉइंटवर गर्दी दिसत आहे. ह्या निर्सगरम्य वातावरणात पर्यटक आनंद लुटत आहेत. तर दुसरीकडे शहरात गटारे तुंबल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. विक्रमगड :पावसाने सद्यस्थितीत सर्वत्र चांगली सुरुवात केली असून या दोन दिवसांत शेती योग्य असा दमदार पाऊस पडला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाने पेरणीच्या कामांना वेगाने सुरुवात केली आहे.
वास्तविक ही कामे जुनच्या पहिल्या आठवडया पासुन सुरु होणे गरजेचे असतांना निसर्गाच्या लहरीपणामुळे ती जूनच्या शेवटच्या आठवडयांत होताना दिसत आहे. त्यामुळे शेतीची कामे लांबणीवर गेली आहेत. मात्र दोन चार दिवसांपासुन विक्रमगड व परिसरात दमदार पावसाने सुरुवात केली असल्याने शेतकरी वर्ग मात्र सुखावला आहे.
दरम्यानच्या काळात उशिरा का होईना मात्र पावसान दमदार हजेरी लावल्याने बळीराजा पेरणीत मग्न झाला आहे. ७ जुनला सुरु होणारा पाऊस जूनच्या अखेरीस बरसला ज्या शेतकर्‍यांकडे बागायती सिंचन आहे अशा शेतकर्‍यांनी नांगरणीला व पेरणीलाही सुरुवात केली आहे. पेरणी नंतर थोडया फार प्रमाणात पाउस पडणे गरजेचे असते.
मात्र, पावसाने बरेच दिवस दडी मारल्याने भाताचे पेरलेले बी उगवेल की नाही, या चिंतेत शेतकरी होते, तर काही शेतकर्‍यांनी पेरणी करण्यांचे थांबविले होते. (वार्ताहर) गावठी भातावर संकट  विक्रमगड मधील गावठी तांदळाचा वाण सर्वत्र प्रसिध्द असून त्यास मोठी मागणीही आहे. या गावठी भाताच्या वाणाला चांगल्या पावसाची गरज असते.  त्याची पेरणी योग्य वेळी व्हावी लागते. काही वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्‍यांच्या भात उत्पादनावर विपरित परिणाम होत असून काही वेळेस नुकसानही सहन करावे लागत आहे.
 हुसेन मेमन राहुल वाडेकर

Labels: , , , , ,

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home