Tuesday, June 28, 2016

पालघर २८ जून २०१६

विक्रमगडातील व्यावसायिक, रहिवासी त्रस्त

 • राहुल वाडेकर,
  विक्रमगड : तालुका व परिसरात भारनियमना व्यतिरिक्त सततच्या होणाऱ्या विजेच्या लंपडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहे़ दिवसभर वीज गुल होत असल्यामुळे नागरिकांचे व त्यावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांचे प्रचंड हाल होत आहेत़ प्रत्येक शुक्रवारी दुरुस्तीच्या नावाखाली होणारी दिवसभराची वीजकपात आणि इतर दिवशीही वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा यामुळे येथील जनता बेजार झाली आहे़ खेडयातील आदिवासी सकाळी शेतावर जातो तो रात्रीच परत येतो त्यामुळे जातांना व येतांना त्याला तर वीज दिसतच नाही़ याबाबत महावितरणाकडे वारंवार तक्रारी करुनही परिस्थितीत कोणत्याही प्रकारची सुधारणा केली जात नाही़ शुक्रवारी दिवसभर दुरुस्तीसाठी वीज कपात केली जाते मग वारंवार वीज खंडीत का होते असा सवाल नागरीक करीत आहेत़ ही समस्या सुटणार तरी कधी असा सवाल केला जात आहे विक्रमगड तालुक्यावर महावितरण इतर तालुक्याच्या तुलनेत अन्याय करीत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. चोवीस तासांपैकी फक्त काही तासच वीज तीही रात्री उपलब्ध होत आहे. दिवसाच्या वीजपुरवठ्यात सातत्य नसल्याने त्याचा फारसा उपयोग नाही . त्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे़ वीजेवर चालणारी उपकरणे बंदच असतात़ तर कधी कमी दाबाच्या प्रवाहामुळे ती चालत नाहीत़ तर कधी दाब वाढल्याने उपकरणे जळतात. विजेचा वापर होत नसतांनाही महावितरण ग्राहकांकडून वीज बील वसूली करीत आहे़ विज बीले वेळेवर भरली नाहीत तर वीज पुरवठा खंडीत केला जातो़
  अनेक वेळा वीज खंडीत होत असते. याचा फटका विजेवर व्यवसाय करणाऱ्यांना मोठया प्रमाणात बसलेला असून विक्रमगड तालुक्यांत हजारोंच्या संख्येने झेरॉक्स, कॉम्प्युटर, दुकानदारआहेत़ छोेटेमोठे व्यवसाय करणारे व्यावसायिक आहेत या समस्येमुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला असल्याने काही व्यवसायिक दुसऱ्या शहरातस्थलातरीत झाले आहेत़ महावितरणाने विक्रमगडची वीजेची समस्या सोडवावी अशी जनतेची मागणी आहे़
  प्रत्येक शुक्रवारी विजेच्या असलेल्या समस्या,दुरुस्ती करण्याकरीता दिवसभर विज खंडित करुन भार नियमन केले जाते व त्यामध्ये दुस्तीची कामे केली जात असल्याचे महावितरण कंपनीकडुन सागण्यात येते.मग वारंवार विज खंडीत होण्याचे प्रकार का होतात़ रात्र रात्र लोकांना का जागुन काढावी लागते़ विजेच्या समस्या तशाच का आहेत़
  - प्रशांत भानुशाली
  गांव तंटामुक्ती अध्यक्ष विक्रमगड

मुसळधार पावसानंतरही पाणीबाणी

Labels: ,

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home