Saturday, June 25, 2016

२५ जुन २०१६ बातम्या

*Aamchi Vasai Updates*
     _*25 june 2016*_

1. *वसई* : पावसाच्या सरीत वसई अंबाडी उड्डाणपूल नागरिकांसाठी आज खुला. उद्घाटनासाठी स्थानिक नेत्यांना डावळल्याने नाराजीचा सूर. अनेक पक्षाचे  कार्यकर्ते राहणार गैरहजर. उद्घाटनासाठी स्थानिक लोकप्रतिनीधी व आमदारांनाही निमंत्रण नाही.

2. *नालासोपारा*: यूपीत दरोडा टाकणारे दोन दरोडेखोर जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 3 रिव्हॉल्व्हर आणि 15 जिवंत काडतूस जप्त. साथीदार फरार.

3. *वसई* : सर आली धावून, रस्ते गेले वाहून. वसई विरार महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराचे पितळ उघडे. रात्री कोसळणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले. अनेक ठिकाणचे रस्ते वाहून गेले. विरार सब वे जवळचा रस्ता पूर्ण वाहून गेला.

4. *नालासोपारा* : सोपऱ्यात घरफोडीचे सत्र सुरूच सलग डॉन दिवस 2 घरफोड्या. लाखोंचा माल लंपास. पोलिसांच्या हाती काही सुगावा नाही.

5. *वसई* : जी. प. शाळेतील शिक्षणाचे तीन तेरा. अपुऱ्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम. अर्नाळा ग्रामस्थांनी पंचायत समितीवर काढला मोर्चा.

6. *वसई* :पालघर जिल्हा परिषद आता फेसबुकवर. पेज वरून स्वीकारल्या जातील नागरिकांच्या तक्रारी.

7. *भाईंदर* :  परीचारिकेच्या हत्त्या  प्रकरणी आरोपीला जन्मठेप.सहा वर्षा पूर्वी केली होती हत्त्या. आर्थिक मदत न दिल्याने केली होती हत्त्या.

8. *विरार* : कणेर वैतरणा रस्त्यासाठी मुहूर्त कधी. दोन वर्षांपूर्वी 25 कोटी मंजूर पालिकेने 19 नोव्हे. 2014 रोजी मंजुरी. अद्यापही काम सुरु नाही. गावकरी छेडणार आंदोलन.

9. *वसई* :  आणखी वसईत 43 लाखाचा गुटखा जप्त. वालीव पोलिसांची कारवाई. आठवड्याभरात ठिकठिकाणीच्या कारवाईत 2 करोडहुन अधिक माल जप्त.
News Courtesy :Samak Diggaj
*-टीम आमची वसई*

टीम *JOIN* करण्यासाठी व नियमित अपडेट्स व वसई संबंधित बातम्यांसाठी आपले पूर्ण नाव व ठिकाण 9323395598 या आमची वसईच्या Whatsapp क्रमांकावर पाठवावे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home