Saturday, June 25, 2016

२५ जुन २०१६ पालघर जिल्ह्यात येत्या काही तासात अतिवृष्टी होणार आहे.

आपणास या संदेशाव्दारे कळविण्यात येत आहे की, हवामान खात्याच्या अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात येत्या काही तासात अतिवृष्टी होणार आहे. त्यामुळे समुद्र किनारी, खाडी किनारी, नदी व नाले किनारी असलेल्या लोकांना व गावांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. सदर बाबत माहिती. मा.पोलीस अधीक्षक सो. पालघर यांचेकडून बिनतारी संदेश प्राप्त झालेला आहे. त्या अनुषंगाने आपणास सावधानतेचा इशारा देत असुन सुचित करीत आहोत की आपले गावाचे परिसरावर लक्ष ठेवा. पुर परिस्थिती, भुखलन इ. नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास तात्काळ सफाळा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. तसेच नैसर्गिक आपत्ती आल्यास प्राथमिक स्तरावर उपयोगात येणारे साहित्य पारगांव चेकपोस्ट येथे उपलब्ध आहे. कृपया गेल्या वर्षी ज्यांनी - ज्यांनी नैसर्गिक आपत्ती चे प्रशिक्षण देवभूमि हाॅल, सफाळा येथे घेतलेले आहे त्यांनी सदर प्रशिक्षणाचा उपयोग योग्य वेळी करावा. आपणास नैसर्गिक आपत्ती संदर्भात काहीही माहिती मिळताच त्याबाबत तात्काळ सफाळा पोलीस स्टेशनशी संपर्क साधून माहिती कळवावी तसेच फोटो व्हाॅट्सअॅपवर पाठवा. सफाळा पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी आपणास योग्य ती मदत करतील .तसेच नैसर्गिक आपत्तीचे प्रशिक्षण ज्या सागर रक्षक व ग्रामरक्षक दल सदस्यांना देण्यात आलेले आहे त्यांनी सतर्क व सफाळा पोलीस स्टेशनशी संपर्कात राहावे. आम्ही आपल्या मदतीस तत्पर आहोत. कृपया आपली  व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या सतर्क व संपर्कात राहा.
सफाळा पोलीस स्टेशन - 02525230255              
सपोनि. मानसिंग पाटील 9987331999  
पोउनि. मौळे 7350606660
पोउनि. पाटील 9967840391
पो.हवा. कुंभारे 8805915506
पो.हवा. सोळंके 9860649889
पो.ना. बागवान 9823809922
पो.ना. आंबेकर 9867723615
पो.ना. दुबळा 9892358117                                                                                                                                        स.पो.नि. मानसिंग पाटील  
सफाळा पोलीस स्टेशन

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home