Friday, June 24, 2016

24 जून 2014 आमची वसई स्थानिक समाचार

*24 जून 2016*
*नमस्कार*...🙏🏻
*आमची वसई स्थानिक समाचार*...!!!

*१)* अग्निशमन कर्मचारी आगीतुन फोफाट्यात.! कंञाटी कर्मचाऱ्यांना हाकलण्याचा महापालिका प्रशासनाचा डाव तर शिवसेना आक्रमक.

*२)* विरार शिवसेननेचं आयुक्तांना आवतण..!जर्जर रस्त्याची पाहणी करा ; अन्यथा:रास्ता रोको आंदोलन.

*३)*पाण्यासाठी रक्त वाहणार..? वसई पूर्वेला टॅकर उपशाला बंद केल्याने जनमत प्रक्षुब्ध.! प्रांताचा तुघलकी फतवा.

*४)* महापालिकेत हवा दक्षता अधिकारी-आ.आनंद ठाकुर.! भ्रष्टाचाराला प्रतिबंध व प्रशासकीय पारदर्शकतेची मागणी.

*५)* मोखाड्यात जनता दरबारात तहसिलदारांनी ऎकली लोकांची गा-हणी..! पालघर जिल्ह्यातील हुतात्मा स्मारकांच्या नूतनीकरणासाठी २५ कोटी रूपयांचा निधी मंजूर.

*६)* अर्नाळा सागरी पोलिसांची गावठी दारूच्या हातभट्टीवर धडक कारवाई..! २८ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त; महिलेसह दोघांना अटक.

*८)* नालासोपारा प्रभाग ड मध्ये अनधिकृत बांधकामांना लावल्या गेलेल्या घरपट्टींची माहितीच विभागीय कार्यालयास नाही.

*९)*कृषी उत्पन्न समितीच्या निवडणूकिच्या पूर्व संध्येला बहुजन विकास आघाडिला गोड बातमी ; पाच संचालक बिनविरोध.

*१०)* सह्याद्री प्रतिष्ठानच्या वसई तालुका प्रसिद्धि प्रमुख पदी *संदेश भोईर*ची नियुक्ती..! तर रत्नागिरी गुहागर तालुका संपर्कप्रमुख पदी नयन चांदोरकर.

*११)* *विरार*: विरार मधील बरफपाडा विभागात गावठी दारूच्या भट्टयांवऱ कारवाई. 30 ते 40 भट्ट्या केल्या उध्दवस्त. हजारो लिटर रसायन आणि दारू जप्त. मुंबई,ठाणे आसपास च्या परिसरात होत होता पुरवठा.

*१२)* *विरार* : विरार मधील बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला पाचूबंदर सागरी किनारी. भाईंदर खाडीत उडी मारून आत्महत्त्या केल्याचा संशय. आत्महत्येचे कारण अस्पस्ट.

 *१३)* *नालासोपारा* : संतोष भुवन येथे 2 लाखाचा गुटखा जप्त. तुळींज पोलिसांची कारवाई.

*१४)* *भाईंदर* : काशीमीरा येथील काशी गावात 60 लाखाचा गुटखा जप्त. एक गोदाम सील आणि 5 टेम्पो जप्त.

*१५)* *वसई* : सत्पाळा येथील जी.प शाळेजवळील रस्ता 1 वर्षापासून नादुरुस्त. विद्यार्थी आणि नागरिकांचे हाल.

*१६)* *वसई* : आदित्य डोंगरे मारहाण प्रकरणी psi सुरेंद्र शिवदे आणि पोलीस नाईक निलेश राऊत यांचे निलंबन. पोलीस दलात मात्र नाराजी. आंदोलन करण्याचा इशारा.

*१७)* *वसई* : रॉकेल काळाबाजारवर  वालीव पोलिसांची कारवाई. 4,300 लिटर रॉकेल जप्त. मुंबई अहमदाबाद महामार्गावर सापळा रचून केली कारवाई.

*१८)* *वसई* : अखेर वसई अंबाडी पुलाचे उद्घाटन 25 जुन रोजी. *सकाळी ११:००* वाजल्यापासून हा सेतू वाहतूकीसाठी खुला करण्यात  येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.
*-टीम आमची वसई*

टीम *JOIN* करण्यासाठी व नियमित अपडेट्स व वसई संबंधित बातम्यांसाठी आपले पूर्ण नाव व ठिकाण 9323395598 या आमची वसईच्या Whatsapp क्रमांकावर पाठवावे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home