Thursday, June 30, 2016

सुशिक्षित बेरोजगारांना आवाहन

सुशिक्षित बेरोजगारांना आवाहन

पालघर : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे या कार्यालयात सुशिक्षित बेरोजगारांची व आर्थिक सहाय्य भाग अंतर्गत काम केलेल्या पदवीधर अंशकालिन उमेदवारांची माहिती अद्यायावत करण्यात येत आहे. यापूर्वी भाग-अ अंतर्गत नाव नोंदणी केलेल्या पालघर व ठाणे जिल्ह्यातील अंशकालिन सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,ठाणे या कार्यालयास दि.११ जुलै २0१६ पर्यंत सकाळी ११.00 ते ५.00 वाजेपर्यंत अंशकालिन कर्मचारी म्हणून अनुभवाचे मुळ प्रमाणपत्न, स्वत:च्या पासपोर्ट आकाराच्या छायाचित्नासह तसेच सद्यस्थितीत नोकरी करीत असल्यास अनुभवाच्या दाखल्यासह शपथपत्न सादर करणे आवश्यक आहे.  ही माहिती कालर्मयादेत असून ती शासनास पाठवायची असल्याने प्राधान्याने वरील कार्यालयात उपस्थित राहून माहिती द्यावी. मुदतीनंतर येणा-या माहितीची , तक्र ारीची दखल घेतली जाणार नाही, असे प्रभारी सहाय्यक संचालक, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे यांनी कळविले आहे.

maharojgar.gov.in या साईटवर अक्षरश: काही मिनिटात नाव नोंदणी करता येते, त्यासाठी पैसे लागत नाहीत. नाव नोंदणी झाल्यावर उमेदवारास मोबाईलवर नोंदणी क्रमांक व इतर आवश्यक माहिती एसएमएसद्वारे येते. या व्यक्तीस सदरहू वेबसाईटवरील होम पेजवर उपलब्ध नोकऱ्यांची अद्ययावत माहिती रोजच्या रोज पहायला मिळते. याशिवाय 18602330133 या हेल्पलाईन क्रमांकावर देखील सर्व मदत केली जाते. नोकरीच्या नाव नोंदणीसाठी कोणीही कोणालाही पैसे देऊ नयेत.

या वेबसाईटवर ३५ हजारपेक्षा जास्त नोकरी देणाऱ्या संस्था, कंपन्या तसेच शासकीय विभागांची नोंदणी असून या साईटच्या माध्यमातूनच ते आवश्यकतेप्रमाणे नोकऱ्यांसाठी कॉल्स देतात त्यामुळे या साइट्स नियमित पाहणे गरजेचे आहे.

Labels: , , ,

तांदूळवाडी किल्ल्याची शिलेदारांनी केली स्वच्छता

हितेन नाईक,
पालघर- आपल्याला स्वराज्य मिळावून देणाऱ्या व स्वराज्यासाठी शत्रूला लढा देत मजबूतीने आजही उभ्या असलेल्या गड, किल्ल्यांची दुर्गांची जोपासना करून तरूणामध्ये इतिहास दीर्घकाळ जागरुक रहावयासाठी सहयाद्री मित्रमंडळाचे शिलेदार मागील अनेक वर्षापासून अविरत झटत आहेत. या मंडळाच्या १७ शिलेदारांनी तांदुळवाडी किल्ल्याच्या संवर्धनासाठी श्रमदानातून त्यावरील पाण्याचा टाक्यांची साफसफाई करून किल्यावर दिशादर्शक व माहिती फलक लावले.
सफाळे रेल्वे स्टेशनच्या ईशान्येस पाच कि.मी. अंतरावर तांदुळवाडी किल्ला असून मराठयांनी इ.स. १७३७ साली हा किल्ला पोर्तुगिजांकडून जिंकून घेतला. या किल्ल्याच्या डोंगर माथ्यावर पाषाणात खोदलेले अनेक जलकुंभ असून तटबंदीच्या खुणाही आढळतात. शासनाचे दुर्लक्ष झाल्याने किल्ल्याची तटबंदी ढासळू लागली आहे. तर निवडुंगासह काटेरी झाडांचा विळखा किल्ल्याला बसू लागला होता. त्यामुळे पालघर तालुक्यातील सहयाद्री मित्रमंडळाच्या माकुणसार, मधाणे, नावझे , केळवे, माहिम, खारेकुरण येथील १७ तरूणांनी एकत्र येत गडाच्या उतारावरील दगड मातीच्या गाळाने भरलेल्या ७ फुटी टाक्या मधील गाळ उपसुन त्या स्वच्छ केल्या. यावेळी निवडुंग व काटेरी झाडांची साफसफाई करून वाटेवर दिशादर्शक मार्गातून मार्गक्रमण करता यावी म्हणून फलक लावले. यावेळी एक नवीन गडावरील ऐतिहासिक वाटेचा शोधही यामंडळातील तरूणांनी लावल्याचे मंडळाचे प्रमुख दिपक पाटील यांनी सांगितले.
पुस्तकनिर्मितीचा मानस
आगामी काळात तांदुळवाडी किल्ल्याची इंत्यभुत माहिती व इतिहास अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने इतिहासाचे अभ्यासक डॉ. श्री दत्त राऊत यांच्या संशोधीत अभ्यासाखाली पुस्तक निर्मितीचा मानसही यावेळी करण्यात आला. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी राकेश पाटील, विराज ठाकूर, निकेश पाटील, आकाश पाटील, सर्वेश पाटील, साहिल पाटील, या सहयाद्री मित्रमंडळाच्या शिलेदारांनी नियोजनबध्द योगदान देत अधिकाधिक तरूणांनी सहभागी होण्याचे आवाहन केले

Labels: , , ,

शहरातील १५० धोकादायक इमारतींमध्ये अद्याप रहिवाशांचे वास्तव्य

वसई-विरार शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बुधवारी पहाटे नालासोपाऱ्यातील आत्मवल्लभ सोसायटीमधील १६ क्रमांकाच्या इमारतीचा सज्जा कोसळला. या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. पालिकेने शहरातील १५० इमारती अतिधोकादायक असल्याचे जाहीर केले असले, तरी अद्याप त्यात रहिवाशांचे वास्तव्य कायम आहे.
नालासोपारा येथे आत्मवल्लभ सोसायटी असून त्यात एकूण २३ इमारतीे होत्या. ३५ वर्षांपूर्वी ही सोसायटी आत्मवल्लभ जैन उत्कर्ष सोसायटीने बांधली होती. या सोसायटीमधील इमारती जीर्ण अवस्थेत असून पालिकेने त्या यापूर्वीच धोकादायक म्हणून घोषित केल्या होत्या. त्यापैकी दोन इमारती यापूर्वीच पाडण्यात आलेल्या आहेत. ५०२ घरांपैकी अनेक जण येथून स्थलांतरित झाले असून अजूनही ९० कुटुंबे या इमारतीत राहत आहेत. बुधवारी सकाळी कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे या सोसायटीमधील इमारत क्रमांक १६ची गॅलरी अचानक कोसळली. सुदैवाने त्यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. या इमारतीत एकूण तीन कुटुंबे राहत आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पालिकेचे पथक घटनास्थळी पोहोचले. या तीनही कुटुंबांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. गेल्या बारा वर्षांपासून या सोसायटीला पालिका नोटिसा बजावत होता. या सोसाटीचा फेरबांधणीचा प्रस्ताव वादामुळे रखडलेला आहे. गेल्या वर्षी या सोसायटीमधील एका इमारतीचा काही भाग कोसळला होता. त्यानंतर दोन अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या होत्या.
शहरात १५० अतिधोकादायक इमारती
वसई-विरार शहरात २५० धोकादायक इमारती असून त्यातील १५० इमारती या अतिधोकादायक असल्याचे पालिकेने जाहीर केले आहे. या अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना बाहेर काढणार असल्याचे पालिकेने सांगितले होते. तशा नोटिसा संबंधित इमारती तसेच स्थानिक पोलिसांना देण्यात आलेल्या होत्या. परंतु अद्याप त्यांना बाहेर काढण्यात आलेले नाही. या सर्व रहिवाशांना बाहेर काढून त्यांची पर्यायी व्यवस्था करण्याचे काम सुरू असल्याचे पालिकेने सांगितले.

Labels: , , , ,

Wednesday, June 29, 2016

२९ जुन २०१६

*नमस्कार*...🙏🏻
*आमची वसई स्थानिक समाचार*...!!!
२९/०६/२०१६
*१)* महापालिकेत पाण्याचे रिकामे माठ फोडणार-
 पाणी प्रश्नावर वसईतील महिला शिवसैनिक आक्रमक.

*२)* ग्रामपंचायतीने १९८१ मध्ये उभारलेली सोपारा बाजारपेठेतील दुमजली  धोकादायक इमारत आज पहाटे कोसळली..! सुदैवाने जीवितहानी टळली.

*३)* वसई मुळगांव येथे घरफोडी. ! दिड लाखांचा मुद्देमाल लांबविला; पोलिसांची तक्रार घेण्यास टाळाटाळ.

*४)* अनधिकृत बांधकाम अधिकृत दाखवून ग्राहकांची फसवणूक..! ञिमूर्ती कंस्ट्रक्शनवर कारवाईची मागणी.

*५)*महामार्गावरुन चोरून नेलेला कंटेनर पोलिसांच्या ताब्यात ४० लाखांचा माल पोलिसांनी केला हस्तगत.

*६)* *नालासोपारा* : समेळ पाडा येथील सोपारा गावात बंद पोस्ट ऑफिस ची इमारत पावसाने कोसळली. कोणतीही मनुष्य हानी नाही. वसई विरार महापालिकेच्या अग्नीशमन दलाने तातडीने घटना स्थळाला भेट दिली आणि मलबा हटवला..

*७)* *वसई* : पावसाच्या पुराचा धोका मिठागरतील कुटुंबांना. प्रशासनाचे दुर्लक्ष. 150 हुन अधिक कुटूंब पुराच्या सावटाखाली.

*८)* *वसई* : बवीआ नगरसेविका अनिता यादव यांचे अनधिकृत पक्ष कार्यालय अखेर पाडण्यात आले.

*९)* *वसई* : वसईत मुलींना पळवणारी टोळीतील एका आरोपीस पोलिसांची अटक. 2 मुलींची उत्तरप्रदेशातून केली सुटका. ह्यूमन ट्रॅफिकिंग चा पोलिसांचा संशय. वसई पोलीस करत आहेत अधिक तपास.

*१०)* *वसई* : पावसाच्या तडाख्याने वसईतील रस्यांनी तोडला दम. ठिकठिकाणी रस्ते उखडले. तर सर्वत्र खड्यांचे साम्राज्य. प्रशासनाने केली नाही रस्ते दुरुस्ती.

*११)* *वसई* : वसईतील स्कायवॉक बेवारस. ना सुरक्षा, ना स्वच्छता, गर्दुल्ले, भिकारी आणि जनावरांचा वावर.

*१२)* *नालासोपरा*: नालासोपारा हरवटे धानीव बाग येथे विहिरीत बुडून मुलाचा मृत्यू. पोहण्यासाठी मित्रांसोबत गेला होता.

टीम *JOIN* करण्यासाठी व नियमित अपडेट्स व वसई संबंधित बातम्यांसाठी आपले पूर्ण नाव व ठिकाण 9323395598 या आमची वसईच्या Whatsapp क्रमांकावर पाठवावे.

पालघरला गटार व्यवस्था पाण्यात

पालघर - गुरुवारपासून (ता. 23) शनिवार (ता. 25)पर्यंत येथे झालेल्या मुसळधारेने शहरातील रस्ते जलमय होऊन खोलगट भागातील घरांत पाणी शिरले. पालिकेने लाखो रुपये खर्चून केलेली रस्ते दुरुस्ती पाण्यात वाहून गेली, तर पालिकेची गटार व्यवस्थाच कोलमडली. त्यामुळे पालघरला पूरपरिस्थिती निर्माण झाली.

गुरुवारपासून संततधार कोसळणाऱ्या पावसाने यंदा पुन्हा नगरपालिकेची परीक्षा पाहिली. नवीन गटारे बांधून तसेच गटाराच्या साफसफाईसाठी मोठा निधी खर्च करूनही नगरपालिका उघडी पडली. शनिवारी माहीम रस्ता, लोकमान्यनगर, गोठणपूर, सुखसागर आदी परिसरात पाणी साचल्याने परिसराला तलावाचे स्वरूप आले होते. पालिकेचे कॉंग्रेसचे माजी नगरसेवक भावानंद संखे यांनी काल सुखसागर आणि ट्रिकल स्कूलजवळ रस्त्यावर साचलेले पाणी काढण्यासाठी सहकार्य केले. गटारे बांधताना उंच-सखल भागांचा विचार न केल्याने तसेच पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने आवश्‍यक नियोजन न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. विविध भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने पालिकेच्या यंत्रणेला जेसीबी यंत्र घेऊन जागोजागी आपली कुमक पाठवावी लागली. दरम्यान, नगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी केलेली गटार सफाई हा विषय चेष्टेचा झाला आहे. पालिकेवर सध्या बळकट असा विरोधी पक्षच नाही. गटार बांधणी, रस्ते या भ्रष्टाचारात विरोधी पक्षाच्या काही नगरसेवकांनी वाहत्या गटाराच्या पाण्यात हात व तोंड चांगलेच धुवून घेतले आहेत, अशी टीका पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष नितांत चव्हाण यांनी केली.

Labels: , ,

डहाणूत शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट गावठी भातावर संकट

आता हवी उघडीप : वाडा, विक्रमगडमध्ये पेरण्यांना वेग, अनेक ठिकाणी विजेचा लपंडाव, झाडे पडल्याने संपर्क तुटला


तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून पाऊस कोसळत असून, नदी, नाले, गावतलाव भरभरून वाहू लागले आहेत. २६ जून २00२ च्या प्रलयाची आठवण करून देत २६ जूनला एकाच दिवशी चक्क २५१ मी.मीटर पाऊस पडला तर २७ जूनला सकाळी उघडीप देईल असे वाटत असतानाच दुपार पासून तुफान पावसाला सुरु वात झाली. मंगळवारच्या सकाळ पर्यंतच्या २४ तासात ११४.६ मी.मीटर पावसाची नोंद झाली तर आठवडा भरात ६५५.३ मी.मीटर, पाऊस पडला हा पाऊस धमणी धरण,कवडास बंधारा आणि साखरे बांधार्‍यात क्षेत्नातही पडल्यामुळे ते बर्‍यापैकी भरले आहे. 

सुरवातीलाच पाऊस सुरू होताच उतावीळ होऊन ज्या शेतकर्‍यांनी भाताचे बियाणे पेरले त्यांची मात्न या सतत पडणार्‍या पावसामुळे पंचाईत झाली आहे. पेरलेल्या भातावर कायमचे पाणी साचून राहिल्याने त्याचे कोंब कुजू लागले आहेत. तर काही दडपून गेले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांवर दुबार भात पेरणीचे संकट ओढावले आहे. या वर्षीही भातशेती वाया जाते की काय ? या चिंतेत शेतकरी सापडला आहे. अद्यापही वेधशाळेने दोन तीन दिवस असाच पाऊस कोसळेल असा इशारा दिल्याने बळीराजाची अवस्था आणखीज बिकट झाली आहे.
आज संध्याकाळी झालेल्या तुफानी पावसाने कंक्रडीपूल वाणगाव येथील डी.जे फॅक्टरी आणि वरोर येथील बंधारा रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद पडली त्यामुळे अनेक वाहने अडकून पडली होती. व स्थानिकांचेही प्रचंड हाल झाले. गेल्या काही दिवसांपासून रिमझिम बरसणार्‍या पावसाने शुक्रवार पासून धुवाँधार सुरवात केलेली असून सोमवार पर्यत जोरदार पडणार्‍या धो-धो पावसाने जव्हार शहराला चांगलेच झोडपल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्री पासून पडणार्‍या पावसाने थोडाही वेळ उघडीप दिलेली नसल्यामुळे नागरीक कंटाळून घराबाहेर निघालेले नाहीत. रस्ते ओस पडलेले आहे. या पावसामुळे शेतकर्‍यांना मात्र चांगला दिलासा मिळाला आहे. काही शेतकर्‍यांनी नांगरणी करण्यास सुरवातही केलेली आहे. धो-धो बरसणार्‍या पावसामुळे भक्कम बांधलेली स्लॅबची घरेही गळायला लागली आहेत, त्यातून ही पाण्याची धार सुरू आहे. तर खेडो पाड्यातील आदिवासींच्या कुडाच्या, पत्र्यांच्या, कौलाच्या घराचे काय हाल झाले असतील याची कल्पनाच केलेली बरी. जिकडे तिकडे नाले, नद्या, बंधारे भरून वाहू लागले आहेत. खेडोपाड्यातून येणार्‍या- जाणार्‍या रस्त्यांवर, मोर्‍यांवर ठिकठिकाणी पाणी साचल्याने काही खेडोपाड्यांचा संपर्क तुटला आहे. संततधार सुरू असल्याने शेतकरी ही दुविधेत पडले आहेत. शेतीसाठी पाऊस पाहिजे परंतु तो नियमीत असावा, अशा प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत. 
दरम्यान जव्हार शहर हे पर्यटन स्थळ असल्याने आणि पावसाळ्यात येथे दाभोसा, हिरडपाडा, काळमांडवी, खडखड, हनुमानपॉईंट, सनसेट पाँईंट, डॅम, जयविलास पॅलेस अशी विविध पर्यटन स्थळे असल्यामुळे पावसाळ्यात येथे असंख्य पर्यटकांची विविध पॉइंटवर गर्दी दिसत आहे. ह्या निर्सगरम्य वातावरणात पर्यटक आनंद लुटत आहेत. तर दुसरीकडे शहरात गटारे तुंबल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. विक्रमगड :पावसाने सद्यस्थितीत सर्वत्र चांगली सुरुवात केली असून या दोन दिवसांत शेती योग्य असा दमदार पाऊस पडला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाने पेरणीच्या कामांना वेगाने सुरुवात केली आहे.
वास्तविक ही कामे जुनच्या पहिल्या आठवडया पासुन सुरु होणे गरजेचे असतांना निसर्गाच्या लहरीपणामुळे ती जूनच्या शेवटच्या आठवडयांत होताना दिसत आहे. त्यामुळे शेतीची कामे लांबणीवर गेली आहेत. मात्र दोन चार दिवसांपासुन विक्रमगड व परिसरात दमदार पावसाने सुरुवात केली असल्याने शेतकरी वर्ग मात्र सुखावला आहे.
दरम्यानच्या काळात उशिरा का होईना मात्र पावसान दमदार हजेरी लावल्याने बळीराजा पेरणीत मग्न झाला आहे. ७ जुनला सुरु होणारा पाऊस जूनच्या अखेरीस बरसला ज्या शेतकर्‍यांकडे बागायती सिंचन आहे अशा शेतकर्‍यांनी नांगरणीला व पेरणीलाही सुरुवात केली आहे. पेरणी नंतर थोडया फार प्रमाणात पाउस पडणे गरजेचे असते.
मात्र, पावसाने बरेच दिवस दडी मारल्याने भाताचे पेरलेले बी उगवेल की नाही, या चिंतेत शेतकरी होते, तर काही शेतकर्‍यांनी पेरणी करण्यांचे थांबविले होते. (वार्ताहर) गावठी भातावर संकट  विक्रमगड मधील गावठी तांदळाचा वाण सर्वत्र प्रसिध्द असून त्यास मोठी मागणीही आहे. या गावठी भाताच्या वाणाला चांगल्या पावसाची गरज असते.  त्याची पेरणी योग्य वेळी व्हावी लागते. काही वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्‍यांच्या भात उत्पादनावर विपरित परिणाम होत असून काही वेळेस नुकसानही सहन करावे लागत आहे.
 हुसेन मेमन राहुल वाडेकर

Labels: , , , , ,

Tuesday, June 28, 2016

वसई विरार महापालिकेच मुख्यालयालगत असलेल्या स्कायवॉकची दुर्दशा

विरार :

 वसई विरार महापालिकेच मुख्यालयालगत असलेल्या स्कायवॉकची दुर्दशा झाली आहे. गर्दुले आणि भिकाऱ्यांनी स्कावॉकचा कब्जा घेतला आहे. उरलीसुरली जागा जोडप्यांनी अश्लिल चाळे करण्यासाठी व्यापली आहे. मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून अनेक ठिकाणी टाईल्स तुटल्या आहेत. मोठे खड्डे पडले आहेत. नियमित सफाई होत नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले असून प्रचंड दुर्गंधी सुटली आहे.

विरार पूर्वेकडील टोटाळे तलावावरून जाणाऱ्या स्कायवॉकचा उपयोग रेल्वे प्रवासी आणि नागरीकांसाठी होईल अशी अपेक्षा होती. मात्र, सध्या स्कायवॉकचा ताबा जोडप्यांनी घेतला आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत ठिकठिकाणी जोडप्यांचे अश्लिल चाळे सुरु असतात. रात्रीच्या वेळी विजेची सोय नसल्याने अनेक समाजकंटक स्कायवॉकचा वापर गैरधंदे करण्यासाठी करीत असतात. याठिकाणाहून दोन वेळा तरुण मुलींनी तलावात उडी मारून आत्महत्येचाही प्रयत्न केला आहे. रखवालदार नसल्याने स्कायवॉक बेवारस होऊन त्याचा ताबा गैरधंदे करणाऱ्यांनी घेतला आहे. गर्दुले आणि भिकाऱ्यांनी स्कायवॉकला आपला अड्डाच बनविला आहे. मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाल्याने ये-जा करताना लोकांना भीती वाटत असते. यामुळे स्कावॉकवर प्रचंड दुर्गंधी पसरली आहे, अशी तक्रार माजी नगरसेवक विलास चोरघे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. आता आयुक्त कोणता प्रतिसाद देतात याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)

तलावातील मासे प्रदूषणामुळे मृत

दरम्यान, स्कावॉकखाली असलेल्या तलावातील शेकडो मासे पाणी दुषित झाल्याने मरुन पडत आहेत. पालिकेच्या मुख्यालयाशेजारी असलेल्या तलावाच्या दुर्दशेबाबत आपण पालिका आयुक्तांना अनेक वेळा लेखी कळवले आहे. मात्र, त्याची दखल आयुक्तांनी अद्याप घेतलेली नाही.
पूर्वी लोकांना नियमितपणे भेटणारे आयुक्त भेटेनासे झाले आहेत. आमच्या तक्रारींची दखलही घेत नाहीत. आयुक्त सध्या कुणाच्या तरी दबावाखाली तर काम करीत नाहीत ना? असे सवाल चोरघे यांनी उपस्थित केला आहे.

Labels: , , , , , ,

पालघर २८ जून २०१६

विक्रमगडातील व्यावसायिक, रहिवासी त्रस्त

 • राहुल वाडेकर,
  विक्रमगड : तालुका व परिसरात भारनियमना व्यतिरिक्त सततच्या होणाऱ्या विजेच्या लंपडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहे़ दिवसभर वीज गुल होत असल्यामुळे नागरिकांचे व त्यावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांचे प्रचंड हाल होत आहेत़ प्रत्येक शुक्रवारी दुरुस्तीच्या नावाखाली होणारी दिवसभराची वीजकपात आणि इतर दिवशीही वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा यामुळे येथील जनता बेजार झाली आहे़ खेडयातील आदिवासी सकाळी शेतावर जातो तो रात्रीच परत येतो त्यामुळे जातांना व येतांना त्याला तर वीज दिसतच नाही़ याबाबत महावितरणाकडे वारंवार तक्रारी करुनही परिस्थितीत कोणत्याही प्रकारची सुधारणा केली जात नाही़ शुक्रवारी दिवसभर दुरुस्तीसाठी वीज कपात केली जाते मग वारंवार वीज खंडीत का होते असा सवाल नागरीक करीत आहेत़ ही समस्या सुटणार तरी कधी असा सवाल केला जात आहे विक्रमगड तालुक्यावर महावितरण इतर तालुक्याच्या तुलनेत अन्याय करीत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. चोवीस तासांपैकी फक्त काही तासच वीज तीही रात्री उपलब्ध होत आहे. दिवसाच्या वीजपुरवठ्यात सातत्य नसल्याने त्याचा फारसा उपयोग नाही . त्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे़ वीजेवर चालणारी उपकरणे बंदच असतात़ तर कधी कमी दाबाच्या प्रवाहामुळे ती चालत नाहीत़ तर कधी दाब वाढल्याने उपकरणे जळतात. विजेचा वापर होत नसतांनाही महावितरण ग्राहकांकडून वीज बील वसूली करीत आहे़ विज बीले वेळेवर भरली नाहीत तर वीज पुरवठा खंडीत केला जातो़
  अनेक वेळा वीज खंडीत होत असते. याचा फटका विजेवर व्यवसाय करणाऱ्यांना मोठया प्रमाणात बसलेला असून विक्रमगड तालुक्यांत हजारोंच्या संख्येने झेरॉक्स, कॉम्प्युटर, दुकानदारआहेत़ छोेटेमोठे व्यवसाय करणारे व्यावसायिक आहेत या समस्येमुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला असल्याने काही व्यवसायिक दुसऱ्या शहरातस्थलातरीत झाले आहेत़ महावितरणाने विक्रमगडची वीजेची समस्या सोडवावी अशी जनतेची मागणी आहे़
  प्रत्येक शुक्रवारी विजेच्या असलेल्या समस्या,दुरुस्ती करण्याकरीता दिवसभर विज खंडित करुन भार नियमन केले जाते व त्यामध्ये दुस्तीची कामे केली जात असल्याचे महावितरण कंपनीकडुन सागण्यात येते.मग वारंवार विज खंडीत होण्याचे प्रकार का होतात़ रात्र रात्र लोकांना का जागुन काढावी लागते़ विजेच्या समस्या तशाच का आहेत़
  - प्रशांत भानुशाली
  गांव तंटामुक्ती अध्यक्ष विक्रमगड

मुसळधार पावसानंतरही पाणीबाणी

Labels: ,

Monday, June 27, 2016

वसई विरार पालघर २७ जुन २०१६

*Vasai Virar Bullet News*
          *27 june 2016*
1. *नालासोपारा*: 5 दिवसाच्या शाहीदाचे बनले पॅनकार्ड. सर्वात कमी वयात पॅनकार्ड बनविल्याचा मान.

2. *वसई*:  चोरी गेलेल्या टेम्पोचा तपास पोलीस लावत नसल्याने. पोलिसांच्या विरोधात टेम्पो चालकांचे आंदोलन. 200 हुन अधिक टेम्पो चालक सहभागी.

3. *वसई* : पालघर जिल्हामहसूल विभागाच्या लिपिक परीक्षेचा पेपर लीक करणारा आरोपी गजाआड. 4 ऑक्टो. रोजी होणार होती परीक्षा. पास करण्यासाठी अनेकांकडून पाच लाखाची मागणी.

5. *भाईंदर* : मीरा भाईंदर पोलिसांची ड्रग्स माफियांच्या विरोधात धडक मोहीम. स्पेशल टीम चे गठन. हेल्प लाईन साठी 8108599191, 7507465012 या नंबरवर कॉल करण्याचे आवाहन.

6. *भाईंदर* : वेलांकनी सागरी किनारा प्रकाशमान करण्यासाठी 9 लाख 97 हजाराचा निधी मंजूर.

7. *वसई*: वीज गुल च्या प्रकरणी काँग्रेस आक्रमक. 29 जून रोजी करणार टाळेबंद आंदोलन.

8. *वसई : *'दिग्गज दखल'* पालघर मधील 35 पैकी 13 गर्दीचे सागरी किनारे स्वच्छतेचे काम सुरु, माहिती फलक आणि लाईफ गार्ड ठेवण्याचे काम सुरु. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिली माहिती.

9. *विरार*: विरार हायवे वरून ऑइल चा 60 लाखाचा कंटेनर चोरीला. 24 तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखा आणि विरार पोलिसांनी शोधला.

10. *वसई* : वालीव मध्ये 40 तासांहून अधिक काळ बत्ती गुल. शुक्रवार पासून ट्रान्सफॉर्मर खराब झाल्याने वीज नाही. नागरिकांत संताप.

*Team Samaj Diggaj*
अधिक बातम्यांसाठी व्हाट्स ऍप नंबर *9322779911* या नंबर वर आपले नाव आणि ठिकाण व्हाट्स ऍप करा.

Palghar farmers will not lose land: CM

Chief Minister Devendra Fadnavis has indicated that the Draft Development Plan (DDP) for Palghar, submitted to the government for approval, could be revised if farmers in eight villages are likely to lose their fertile land. (http://dtp.maharashtra.gov.in/site/forms/admin/ddtp/konkan/thane/REPORT/Palghar/2.pdf)
Farmers from these Palghar villages are likely to lose their farms, as most of their land has been either marked as reserved plots or set aside for roads in the DDP, first prepared in 2011.
The DDP, which was forwarded to the CM for final approval in January 2016, consists a chunk of private land, mostly fields, marked as reserved plots. While 131.90 hectares of private land is reserved for gardens, schools, playgrounds and hospitals, only 76.52 hectares of government land has been reserved. The DDP was first published in March 2013, 17 years after the Palghar Municipal Council was formed. It was published with changes in January 2015 by the Director, Town Planning, Pune and was submitted to the government for approval, which is pending.
The assurance from the CM came after political leaders from across parties met him to discuss the issue on Friday. The delegation, led by Palghar MLAs Amit Ghoda and Hitendra Thakur, Dahanu MLA Paskal Dhanare, Boisar MLA Vilas Tare, BJP MP Chintaman Wanga and BJP’s Tribal Development Minister Vishnu Sawra, who is also the Guardian Minister for Palghar, highlighted the incorrect data in the revised DDP. They were accompanied by members of the Prarup Vikas Arakhada Virodhi Sangharsha Samiti, led by Ramakant Patil.
Mr. Patil, convenor of the Sangharsha Samiti, which was formed to oppose the DDP in the current form, said only land belonging to farmers has been taken into consideration for the DDP, and the huge tracts of land belonging to the builders have been spared.
“The Existing Land Use Map (ELUP), which was prepared in 2008, was obviously made by bureaucrats sitting in air-conditioned offices, who did not physically come to the field to observe the plots under reservation. Hence, wrong data was entered into the DDP,” said Mr. Patil. He said the CM conceded that small errors had crept into the ELUP.
The farms of many villagers have been marked as reserved plots or set aside for roads in the DPP

Labels: , , , , , , ,

जि.प. शाळांतील विद्यार्थ्यांची आबाळ निधी नाही : शिक्षकांनाच पुरवावा लागतो पोषण आहार

राहुल वाडेकर■ विक्रमगड
विक्रमगड तालुक्यात एकूण २३७ जिल्हा परिषद मराठी शाळा कार्यरत आहेत. त्यामध्ये जवळपास २४ हजारांच्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत असतात. विद्यार्थ्यांची गळती थांबली जावी,त्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि या प्रक्रियेतून विदयार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावला जावा,यासाठी शासनाकडून लाखो रुपये निधी दिला जातो. तसेच विद्यार्थ्यांची १00 टक्के पटनोंदणी करण्यासाठी शासनाकडून विदयार्थ्यांना गणवेश, पाठयपुस्तके व शाळेमध्ये पोषण आहराची व्यवस्था केली गेली आहे. मात्र शाळा सुरु होऊनही आज ११ दिवस उलटून गेले असतांनाही विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्यात आलेला नाही. सद्यस्थित शाळांवरील शिक्षण आपल्या खिशातून पदरमोड करुन साहित्य विकत आणून आहार देत आहेत.
परंतु हे किती दिवस चालणार शाळा सुरु होतांच पोषण आहाराची सामुग्री देणे आवश्यक होते. पण ते झालेले नाही. ज्या ठिकाणी केंद्र शाळा आहेत. त्यामध्ये पहिली ते ८ वी पर्यतच्या वर्गात जवळ जवळ ४00 ते ४५0 विदयार्थी असतात. एवढया मोठया विदयार्थ्यांना लागणार्‍या पोषण आहाराचेसाहित्य खरेदी करीतांना येथील शिक्षकांना मोठी करसरतच करावी लागते आहे. त्यातच शिक्षकांचे पगार महिन्याला वेळेत होत नसल्याची अडचण आहे. त्यामुळे रोज पोषण आहार पुरविण्यासाठी लागणारे साहित्य घेण्याकरीता शिक्षकांना उसनवारी करावी लागत आहे. ही संपूर्ण जबाबदारी येथील गट शिक्षणाधिकार्‍यांची असून त्यांनी पोषण आहार सामग्रीसाठी निधीची तरतूद करणे गरजेचे आहे.
मात्र ते सारी जबाबदारी शिक्षकांवर टाकून मोकळे झाले आहेत. त्यामुळे यामध्ये मरण होते ते शिक्षकांचे काही शाळा या खुप अडचणींच्या ठिकाणी व दुरवर असल्याने तेथे वाहतुकीची सोय नसल्याने तेथे े साहित्य नेणे देखील जिकिरीचे होत आहे. शाळेवर पोषण आहार पुरवितांना शिक्षकांना आपल्या खिशाला चाट द्यावी लागत असल्याने त्यांच्यामधून नाराजीचा सूर उमटत आहे. अदयापही शासनाने शाळांना निधी दिलेला नसल्याने विदयार्थ्यानां पोषण आहार पुरविण्याची जबाबदारी शिक्षकांवर आली आहे. अगोदर वेळेत पगार नाही व आता पोषण आहारासाठी पैसे तरी कुठून आणावयाचे हा प्रश्न आहे.
- संजय तुकाराम आयरे, नेते शिक्षक संघटना विक्रमगड.

Labels: , , , , , , , , ,

रिक्षावाल्याची कन्या दिल्लीला विमानाने

वसई : लोकमतच्या संस्काराचे मोती या शैक्षणिक उपक्रमात सहभागी झालेली नारिंगी येथील आदर्श विद्यालयाची आठवीतील विद्यार्थीनी व रिक्षाचालकाची कन्या मानसी नरेश पाटील ही विमानाने दिल्लीची सफर करून आली. या सफरीत तिने तिच्या सारख्याच ३५ जिल्हय़ातून विजयी झालेल्या मित्र-मैत्रिणींसमवेत रेल्वेमंत्री सुरेश प्रभु, गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी संवाद साधला. तसेच इंदिरा गांधींच्या निवास स्थानाला भेट दिली.
यामुळे तिच्या शाळेत जल्लोशाचे वातावरण होते. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शोभना कलगुटकर यांनी सांगितले, की माझ्या विद्यालयातील विद्यार्थी दरवर्षी संस्काराचे मोती या उपक्रमात सहभागी होत असतात. मानसीच्या यशामुळे आता अधिक विद्यार्थी यावर्षी सहभागी होतील. तिच्या आईचा तर प्रारंभी या बाबतच्या वृत्तावर विश्‍वासच बसला नव्हता. परंतु नंतर तिला खूप आनंद झाला. (प्रतिनिधी) इयत्ता दुसरी पासून मी संस्काराचे मोती या स्पर्धेत सहभागी होते आहे. त्यामुळे माझा खूप विकास झाला यावर्षीही मी सहभागी झाले होते, पण हवाई सफरीचे यश मात्र अनपेक्षित होते. सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, मोठे व्हावे

Labels: , , , , , , , , ,

Sunday, June 26, 2016

वसई विरार पालिकेचा नालेसफाईचा दावा फेल

काल रात्रीपासून कोसळत असलेल्या पावसाने नालासोपारा शहर जलमय केले. रेल्वे उड्डाणपूलाखालून जाणारा आणि सेंट्रल पार्क मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. तर अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले होते. नवघर एसटी स्टँडमध्ये पाणी साचून राहिल्याने प्रवाशांचे हाल झाले होते. तर पश्‍चिम पट्टयात काही रस्त्यांवर पाणी तुंबले होते. एकंदरीत पावसाच्या तडाख्याने वसई विरार पालिकेचा नालेसफाईचा दावा फेल गेला.

गेल दोन दिवसांपासून हजेरी लावलेल्या पावसाने काल रात्रभर जोरदार तडाखा दिला. नालासोपारा पूर्वेकडील तीनही मुख्य रस्ते पाण्याखाली गेले होते. आचोळे रस्ता, हावे रस्ता आणि सेंट्रल पार्क रस्ता या चारही मुख्य रस्त्यांवर दुपारपर्यंत गुडघाभर पाणी तुंबून राहिले होते. सेंन्ट्रलपार्क, तुळींज, टाकीपाडा रोड, नगिनदासपाडा, संतोषभुवन, बिलालपाडा, मोरेगाव, आचोळे गाव या ठिकाणी रेल्वे स्थानकातून जाण्यासाठी तीन मुख्य रस्ते आहेत. याच रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याने वाहनधारकांना आणि नागरिकांना जीवघेणी कसरत करीत जावे लागत होते.  तुळींज डोंगरावरून येणारे पाणी वाहून जाण्यासाठी मोठे नाले आणि गटारे नसल्याने हे तीनही मुख्य रस्ते दरवर्षी पाण्याखाली जातात. तुळींज पोलिस ठाण्यासमोरील गटारीचा स्लॅब तुटला आहे. त्याठिकाणी पाणी जाण्यासाठी मार्गच शिल्लक राहिला नाही.
 तुळींज पोलीस ठाण्याची इमारत मुख्य रस्त्यालगत असलेल्या गटारावर बांधलेली आहे. पालिकेने गेल्याच महिन्यात पोलीस ठाण्याला नोटीसही बजावली होती. नेमक्या याच परिसरात आज गुडघाभर पाणी साचल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती
 सेंन्ट्रलपार्क रस्त्यावर गुडघाभर पाणी साचून राहिले असून रस्त्यालगत असलेल्या गटाराच्या स्लॅबला तडे गेल्याने पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे गटाराचे काम निकृष्ट असल्याचे उघड झाले. 
 नवघर एसटी स्टँड पुन्हा पाण्याखाली गेल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. संध्याकाळर्पंत गुडघाभर पाणी तुंबून राहिले होते. त्यामुळे वाहतूकीवर परिणाम होत होता. वसई पश्‍चिम पट्ट्यातील अनेक भागात पाणी साचून राहिल्याने लोकांची गैरसोय झाली होती. एकंदरीत पहिल्याच पावसाने वसई विरार पालिकेच्या नालेसफाईच्या कामाचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून आले.

संपूर्ण तालुक्यात शुक्रवारी सायंकाळपासूनच पावसाने मुसळधार हजेरी लावली असून परवा पर्यंत जे शेतकरी आकाशाकडे टक लावून होते त्यांनी शेतीच्या कामांना सुरुवात केली आहे. नांगरणी अगोदरच झाली होती मात्र जोरदार पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी चिखलणीला सुरुवात केली आहे. तारापूरच्या मुरंबेभागात शेतकर्‍यांनी चिखलणीसाठी बैलाजोडी शेतात उतरविल्याचे चित्र पहायला मिळत होते. मनोर : सकाळ पासून मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे मनोर परिसरात जनजीवन विस्कळीत झाले असून मनोर पालघर रस्त्यावर असलेल्या वाघोबा मंदिराच्या शेजारी असलेल्या दुकानावर झाड पडल्याने नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतकरी मात्न समाधानी आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने ग्रामीण भागातील नदी, नाले, शेती भरले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे तर दुकानदारांची माल वाचविण्यासाठी धावपळ उडाली आहे. तसेच रस्त्यावर पाणी सचल्याने पादचार्‍याना मार्ग काढणे अवघड झाले आहे.
-पंकज राऊत , हनिफ पटेल

Labels:

पालघर जिल्हय़ाला मुसळधारांनी झोडपले

 पालघर जिल्हय़ाला मुसळधारांनी झोडपले

शेतीच्या कामांना वेग : बळीराजा सुखावला, शहरवासीयांची तारांबळ, अनेक रस्ते जलमय, वीज झाली खंडित

जव्हारमध्ये संततधार, जिल्हात तुफानी पाऊस, अनेक झाडे पडली, घरांची पडझड , पहिल्याच पावसात नालासोपारा जलमय , सततच्या पावसामुळे मनोरचे जनजीवन विस्कळीत

लोकमत चमू■ पालघर

पंधरवड्यापासून हुलकावणी देणार्‍या पावसाने आज संपूर्ण पालघर जिल्ह्याला मुसळधारांनी झोडपून काढले. त्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. सर्वाधिक पाऊस पालघर तालुक्यात १४२.३ मी.मी. झाला. तर जिल्हयात आजच्या तारखेपर्यंत १४0.९ मि. मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीयाच तारखेपर्यंत सरासरी ५९३.८ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली होती. ७ जूनला आगमन होणार्‍या पावसाने दडी मारल्याने पेरणीसाठी थांबलेल्या शेतकर्‍यांची मोठी कुचंबणा झाली होती. मात्र पाऊस सुरू झाल्याने बळीराजा पेरणीची कामे हाती घेऊ शकला. संततधार कोसळणार्‍या पावसाने पेरणीच्या कामात काहीसे अडथळे आणले असून पेरणीची कामे खोळंबल्याचे दिसून येते. जिल्हयात पालघरमध्ये सर्वाधिक पाऊस पडला असून त्याच्या खालोखाल वसई व डहाणू तालुक्यात पावासाची नोंद झाली आहे. या उलट वाडा, जव्हार, विक्रमगड, तलासरी या पाणीटंचाई ग्रस्त व आदिवासी तालुक्यात मात्र पावसाचे प्रमाण कमी आहे.
गेल्या तीन दिवसापासून पाऊस पडत असून मनोर परिसरात पेरणीच्या कामाला वेगात सुरूवात केली आहे. पावासामुळे शेतकरी समाधानी झाल्याचे चित्र दिसत आहे. नांगरणी, पेरणी, शेतात पाणी साचविण्यासाठी खंड बांधणे घोंगडी ईरले तयार करणे अशी विविध काम जोमात सुरू केली आहेत. तर रोजगार सुरू झाल्याने शेतमजूरही आता खूष झाले आहेत.

तालुके २४ जून २0१६ २५ जून२0१६ एकुण २५ जून २0१५
वसई ११७.२ मि.मी. १0९.0 मि.मी. २२६.२ मि.मी ७७५.0 मि.मी
वाडा ८.६ मि.मी ४४.३ मि.मी ५२.९ मि.मी ४९४.१ मि.मी
डहाणू ६८.८ मि.मी ५१.१ मि.मी ११९.१ मि.मी ६0१.१ मि.मी
पालघर १४३.१ मि.मी १४२.३ मि.मी २८५.४ मि.मी ६६0.२ मि.मी
जव्हार ९.६ मि.मी १0.0 मि.मी १९.६ मि.मी ५२८.८ मि.मी
मोखाडा २.२ मि.मी १३.६ मि.मी १५.८ मि.मी ३६९.२ मि.मी
तलवाडा ११.८ मि.मी २२.५ मि.मी ३४.३ मि.मी ४00.0 मि.मी
विक्रमगड १३.८ मि.मी १७.८ मि.मी ३१.६ मि.मी ५१८.२ मि.मी
एकूण ६९.६ मि.मी ७१.३ मि.मी १४0.९ मि.मी ५९३.

दहशतवाद्यांच्या जामिनासाठी आदिवासींचा वापर - भगवान खैरनार - सकाळ वृत्तसेवा

दहशतवाद्यांच्या जामिनासाठी आदिवासींचा वापर
- भगवान खैरनार - सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जून 2016 - 01:15 AM IST
Share Link: http://www.esakal.com/Tiny.aspx?K=U9V49b
  

मोखाडा - मुंबईत घातपात घडविण्याच्या कटाप्रकरणी अटक झालेल्या दहशतवाद्यांना सोडविण्यासाठी पालघर जिल्ह्यातील मोखाडा परिसरातील गरीब, अशिक्षित आदिवासींचा वापर होत आहे, अशी धक्कादायक माहिती समजली आहे. या आदिवासींना पैशाचे प्रलोभन दाखवत किंवा कर्ज काढून देतो, असे सांगत त्यांच्या नावे तयार करण्यात आलेल्या बनावट कागदपत्रांचा वापर दहशतवाद्यांना जामीन मिळवून देण्यासाठी केला जात आहे. ही बनावट कागदपत्रे बनविणारे दहशतवाद्यांचे हस्तक तीन वर्षांपासून या परिसरात सक्रिय आहेत. 

दहशतवाद्याला जामीन राहताना बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी मोखाडा तालुक्‍यातील जोगलवाडी या खेड्यातील भीमा सारक्ते या अशिक्षित आदिवासीला सहा महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला. त्यामुळे त्याच्या भावाने मिळविलेल्या माहितीनंतर हे उघडकीस आले. 

मुंबईतील काळाचौकी पोलिसांनी 5 डिसेंबर 2014 रोजी बाबू अब्दुल हक खान या दहशतवाद्याला अटक केली होती. त्याला जामीन राहण्यासाठी दहशतवाद्यांच्या हस्तकांनी भीमाला कर्ज मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवले. नंतर त्याच्या नावाचा बनावट ऐपतीचा दाखला, तसेच शशिकांत जाधव नावाच्या पोलिस अधिकाऱ्याची बनावट सही असलेला मोखाडा पोलिस ठाण्याचा दाखला बनविण्यात आला. त्या दाखल्यावरील सरकारी शिक्केही बनावट होते. बाबू खानला जामीन मिळवून देण्यासाठी ही कागदपत्रे 15 डिसेंबर 2014 रोजी माझगाव येथील 15 व्या महानगर दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात सादर करण्यात आली. न्यायालयाच्या आदेशानुसार पडताळणीत ती कागदपत्रे संशयास्पद असल्याचे निदर्शनास आल्यानंतर न्यायालयाने खान याचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर न्यायालयाने 18 डिसेंबर 2014 रोजी या प्रकरणी फेरचौकशीचे आदेश काळाचौकी पोलिसांना दिले. त्यानुसार काळाचौकी पोलिसांनी मोखाडा तहसील कार्यालय, तसेच मोखाडा पोलिसांशी संपर्क साधून कागदपत्रांची पडताळणी केली. त्या वेळी मोखाडा पोलिस, तसेच तहसीलदारांनी शशिकांत जाधव नावाचा अधिकारी कधीही नव्हता; तसेच कागदपत्रांवरील शिक्काही आमच्या कार्यालयाचा नाही, असे स्पष्ट केले. 

न्यायालयात बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी भीमा सारक्तेविरोधात 24 डिसेंबर 2014 रोजी रफी अहमद किडवाई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. 5 जानेवारी 2015 रोजी त्याला पोलिसांनी अटक केली. सहा महिने तो ऑर्थर रोड तुरुंगात होता. दरम्यानच्या काळात भीमाच्या कुटुंबीयांनी मोखाडा पोलिस ठाण्यात दाद मागितली; मात्र पोलिसांनी त्यांची तक्रार मान्य केली नाही. अखेर भीमाचे बंधू नामदेव सारक्ते यांनी खटपट करत 16 जून 2016 रोजी त्याला जामीन मिळवून दिला. 

त्यानंतर नामदेव यांनी या प्रकरणी अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. ठाण्यातील कासारवाडी परिसरात पोलिसांनी 14 सप्टेंबर 2014 रोजी शफीक अस्लम खान (वय 21), फजाईल अहमद ऊर्फ दानिश बागहुसेन खान (20), माजिद फरीद खान (21), मजहर हुसेन मोहम्मद खान (21), अश्‍फाक मोहम्मद अस्लम खान (30), मोहम्मद शकील मोहम्मद शेख (28) या काश्‍मिरी दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यांच्या जामिनासाठी मोखाडा परिसरातील आदिवासींचा वापर केला गेल्याची माहिती नामदेव यांना मिळाली. 

पाचशे-हजार रुपयांवर बोळवण 
आपण कुणाला जामीन राहत आहोत, याची कल्पना नसलेल्या आदिवासींना न्यायालयात नेत असत. तिथे त्यांच्या स्वाक्षऱ्या-अंगठा घेऊन दहशतवाद्यांना जामीन मिळवून दिला जात असे. नंतर या आदिवासींच्या हातावर पाचशे-हजार रुपये टेकवून त्यांची बोळवण केली जात असे. 

कर्ज मिळवून देतो, असे सांगत खोडाळा गावातील अस्लम पठाण आणि अनसूया गोरे यांनी माझ्याकडील कागदपत्रे मागितली. कागदपत्रे दिल्यानंतर त्यांनी मला मुंबईत नेऊन न्यायालयात हजर केले. न्यायालयात मी नाव व पत्ता सांगितला. त्यानंतर त्या दोघांनी मला पाचशे रुपये देऊन घरी पाठवले. त्यांनीच माझ्या नावाची बनावट कागदपत्रे बनवली. मी अशिक्षित असल्याने मला काहीही समजले नाही. 
- भीमा सारक्ते, आदिवासी, जोगलवाडी, पालघर

Saturday, June 25, 2016

२५ जुन २०१६ बातम्या

*Aamchi Vasai Updates*
     _*25 june 2016*_

1. *वसई* : पावसाच्या सरीत वसई अंबाडी उड्डाणपूल नागरिकांसाठी आज खुला. उद्घाटनासाठी स्थानिक नेत्यांना डावळल्याने नाराजीचा सूर. अनेक पक्षाचे  कार्यकर्ते राहणार गैरहजर. उद्घाटनासाठी स्थानिक लोकप्रतिनीधी व आमदारांनाही निमंत्रण नाही.

2. *नालासोपारा*: यूपीत दरोडा टाकणारे दोन दरोडेखोर जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 3 रिव्हॉल्व्हर आणि 15 जिवंत काडतूस जप्त. साथीदार फरार.

3. *वसई* : सर आली धावून, रस्ते गेले वाहून. वसई विरार महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराचे पितळ उघडे. रात्री कोसळणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले. अनेक ठिकाणचे रस्ते वाहून गेले. विरार सब वे जवळचा रस्ता पूर्ण वाहून गेला.

4. *नालासोपारा* : सोपऱ्यात घरफोडीचे सत्र सुरूच सलग डॉन दिवस 2 घरफोड्या. लाखोंचा माल लंपास. पोलिसांच्या हाती काही सुगावा नाही.

5. *वसई* : जी. प. शाळेतील शिक्षणाचे तीन तेरा. अपुऱ्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम. अर्नाळा ग्रामस्थांनी पंचायत समितीवर काढला मोर्चा.

6. *वसई* :पालघर जिल्हा परिषद आता फेसबुकवर. पेज वरून स्वीकारल्या जातील नागरिकांच्या तक्रारी.

7. *भाईंदर* :  परीचारिकेच्या हत्त्या  प्रकरणी आरोपीला जन्मठेप.सहा वर्षा पूर्वी केली होती हत्त्या. आर्थिक मदत न दिल्याने केली होती हत्त्या.

8. *विरार* : कणेर वैतरणा रस्त्यासाठी मुहूर्त कधी. दोन वर्षांपूर्वी 25 कोटी मंजूर पालिकेने 19 नोव्हे. 2014 रोजी मंजुरी. अद्यापही काम सुरु नाही. गावकरी छेडणार आंदोलन.

9. *वसई* :  आणखी वसईत 43 लाखाचा गुटखा जप्त. वालीव पोलिसांची कारवाई. आठवड्याभरात ठिकठिकाणीच्या कारवाईत 2 करोडहुन अधिक माल जप्त.
News Courtesy :Samak Diggaj
*-टीम आमची वसई*

टीम *JOIN* करण्यासाठी व नियमित अपडेट्स व वसई संबंधित बातम्यांसाठी आपले पूर्ण नाव व ठिकाण 9323395598 या आमची वसईच्या Whatsapp क्रमांकावर पाठवावे.

एस. टीची सरळ सेवा भरती प्रक्रिया

एस. टीची सरळ सेवा भरती प्रक्रिया
(स्वतः पहा नंतर दुसऱ्याला कळवा)

मुंबईः महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) वाहक, चालक, सहाय्यक आणि लिपिक अश्या एकुण १९,७८९ पदांसाठी अॉन लाईन अर्ज मागवत आहे.

(१) रिक्त पदांची नावेः
१) वाहकः ८९४८ पदे
२) चालकः ६२४७ पदे
३) सहाय्यकः २६५८ पदे
४) लिपिक/टंकलेखकः १९३६ पदे

(२) एकुण रिक्त पदांची संख्याः १९,७८९.

(३) वयो मर्यादाः अर्जदाराचे वय हे दि. ७/०८/२०१६ रोजी २१ वर्ष ते ३५ वर्षाच्या आतिल असावे.

(४) शैक्षणिक अर्हताः अर्जदार इयत्ता १०वी उत्तीर्ण असावा/मराठी भाषेचं उत्तम ज्ञान असावे/ज्या पदासाठी अर्ज करणार आहे त्या संबंधित पदाचा आय. टी. आय. किंवा समान कोर्स उत्तीर्ण असावा/वाहन चालकाचा परवाना आवश्यक.

(५) अर्जाची फीः रु. ३००/- (मागासवर्गीयांसाठी रु. १५०).

(६) अर्जाची फी देण्याची अंतिम दिनांकः ७/०९/२०१६.

(७) अर्ज कसा करावाः सर्व अर्जदार आपले अर्ज अॉनलाईन पध्दतिने दि. ७/०८/२०१६ ते ७/०९/२०१६ च्या दरम्यान एस. टी. महामंडळाच्या (http://msrtc.mkcl.org किंवा http://mahast.in) ह्या अधिकृत वेबसाइटवरच भरु शकतिल.

(८) अॉनलाईन रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांकः ५/०९/२०१६

महत्वाचेः कृपया अधिक माहितीसाठी एस. टी. महामंडळाच्या सरळ सेवा भरती प्रक्रिया वेबसाइटवर
(http://mahast.in/STAPP20152/PublicHomeM.aspx) लॉगइन करा
किंवा दि. ७/०८/२०१६ पर्यंत वाट पहा, धन्यवाद!!!

२५ जुन २०१६ पालघर जिल्ह्यात येत्या काही तासात अतिवृष्टी होणार आहे.

आपणास या संदेशाव्दारे कळविण्यात येत आहे की, हवामान खात्याच्या अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात येत्या काही तासात अतिवृष्टी होणार आहे. त्यामुळे समुद्र किनारी, खाडी किनारी, नदी व नाले किनारी असलेल्या लोकांना व गावांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. सदर बाबत माहिती. मा.पोलीस अधीक्षक सो. पालघर यांचेकडून बिनतारी संदेश प्राप्त झालेला आहे. त्या अनुषंगाने आपणास सावधानतेचा इशारा देत असुन सुचित करीत आहोत की आपले गावाचे परिसरावर लक्ष ठेवा. पुर परिस्थिती, भुखलन इ. नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास तात्काळ सफाळा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. तसेच नैसर्गिक आपत्ती आल्यास प्राथमिक स्तरावर उपयोगात येणारे साहित्य पारगांव चेकपोस्ट येथे उपलब्ध आहे. कृपया गेल्या वर्षी ज्यांनी - ज्यांनी नैसर्गिक आपत्ती चे प्रशिक्षण देवभूमि हाॅल, सफाळा येथे घेतलेले आहे त्यांनी सदर प्रशिक्षणाचा उपयोग योग्य वेळी करावा. आपणास नैसर्गिक आपत्ती संदर्भात काहीही माहिती मिळताच त्याबाबत तात्काळ सफाळा पोलीस स्टेशनशी संपर्क साधून माहिती कळवावी तसेच फोटो व्हाॅट्सअॅपवर पाठवा. सफाळा पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी आपणास योग्य ती मदत करतील .तसेच नैसर्गिक आपत्तीचे प्रशिक्षण ज्या सागर रक्षक व ग्रामरक्षक दल सदस्यांना देण्यात आलेले आहे त्यांनी सतर्क व सफाळा पोलीस स्टेशनशी संपर्कात राहावे. आम्ही आपल्या मदतीस तत्पर आहोत. कृपया आपली  व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या सतर्क व संपर्कात राहा.
सफाळा पोलीस स्टेशन - 02525230255              
सपोनि. मानसिंग पाटील 9987331999  
पोउनि. मौळे 7350606660
पोउनि. पाटील 9967840391
पो.हवा. कुंभारे 8805915506
पो.हवा. सोळंके 9860649889
पो.ना. बागवान 9823809922
पो.ना. आंबेकर 9867723615
पो.ना. दुबळा 9892358117                                                                                                                                        स.पो.नि. मानसिंग पाटील  
सफाळा पोलीस स्टेशन

Friday, June 24, 2016

आदिवासी पुन्हा जंगलाकडे रवाना

आदिवासी पुन्हा जंगलाकडे रवाना

लहान मुलांबरोबर मोठय़ा प्रमाणात महिलांचा समावेश आहे.


पाऊस सुरू झाल्याने नागरी वस्तीतून मूळगावी डहाणूच्या दुर्गम भागातील आदिवासी रोजगारासाठी दरवर्षी डहाणूच्या पश्चिम भागात स्थलांतर करत असतात आणि मे महिनाअखेर ते पुन्हा जंगलाकडे जातात. परंतु यंदा पाऊस लांबल्याने शेकडो आदिवासी मजूर या परिसरातच मजुरी करून राहत होते. अखेर २० जून रोजी बंदरपट्टी भागाच्या विविध गावातून आदिवासी मजूर जंगलाकडे निघाले आहेत. त्यात लहान मुलांबरोबर मोठय़ा प्रमाणात महिलांचा समावेश आहे. डहाणूसारख्या आदिवासीबहुल तालुक्यात कायमस्वरूपी रोजगार नसल्याने दरवर्षी सायवन, निंबापूर, दिवसी, दाभाडी, धरमपूर, शोणसरी, जांगुडी, कैनाड, ओसरवीरा, धुंदलवाडी, वंकास, शिलोंडा, इत्यादी भागातील आदिवासी रोजगारासाठी भिवंडी, वसई, अर्नाळा, मनोर, बोईसर तसेच डहाणूच्या पश्चिम भागातील वाणगाव, चिंचणी, डहाणू खाडी, तारापूर इत्यादी गावात येऊन बागायती, इमारत व्यावसायिक तसेच मिळेल ते काम करतात. टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी हे आदिवासी दीपावली झाल्यानंतर आपल्या मुलाबाळांसह येथे राहून मजुरीची कामे करत असतात. यामध्ये मोठय़ा प्रमाणात तरुण मुली तसेच महिला असतात. हे आदिवासी मिरची, चिकूच्या वाडीत काम करत असतात. शिवाय या परिसरातील बांधकाम व्यावसायिकांकडे चांगली मजुरी मिळत असल्याने ते दरवर्षी येथे मोठय़ा प्रमाणात येत असतात. दरम्यान, पावसाळा जवळ आला की हे आदिवासी अधूनमधून घरी जाऊन त्यांचे राहते घर, झोपडी दुरुस्त करत असतात. यावर्षी पाऊस उशिराने दाखल झाल्याने गेल्या दोन-तीन दिवसांपासून आदिवासी मजुरांनी जंगलाकडे जाण्यास सुरुवात केली आहे. 

24 जून 2014 आमची वसई स्थानिक समाचार

*24 जून 2016*
*नमस्कार*...🙏🏻
*आमची वसई स्थानिक समाचार*...!!!

*१)* अग्निशमन कर्मचारी आगीतुन फोफाट्यात.! कंञाटी कर्मचाऱ्यांना हाकलण्याचा महापालिका प्रशासनाचा डाव तर शिवसेना आक्रमक.

*२)* विरार शिवसेननेचं आयुक्तांना आवतण..!जर्जर रस्त्याची पाहणी करा ; अन्यथा:रास्ता रोको आंदोलन.

*३)*पाण्यासाठी रक्त वाहणार..? वसई पूर्वेला टॅकर उपशाला बंद केल्याने जनमत प्रक्षुब्ध.! प्रांताचा तुघलकी फतवा.

*४)* महापालिकेत हवा दक्षता अधिकारी-आ.आनंद ठाकुर.! भ्रष्टाचाराला प्रतिबंध व प्रशासकीय पारदर्शकतेची मागणी.

*५)* मोखाड्यात जनता दरबारात तहसिलदारांनी ऎकली लोकांची गा-हणी..! पालघर जिल्ह्यातील हुतात्मा स्मारकांच्या नूतनीकरणासाठी २५ कोटी रूपयांचा निधी मंजूर.

*६)* अर्नाळा सागरी पोलिसांची गावठी दारूच्या हातभट्टीवर धडक कारवाई..! २८ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त; महिलेसह दोघांना अटक.

*८)* नालासोपारा प्रभाग ड मध्ये अनधिकृत बांधकामांना लावल्या गेलेल्या घरपट्टींची माहितीच विभागीय कार्यालयास नाही.

*९)*कृषी उत्पन्न समितीच्या निवडणूकिच्या पूर्व संध्येला बहुजन विकास आघाडिला गोड बातमी ; पाच संचालक बिनविरोध.

*१०)* सह्याद्री प्रतिष्ठानच्या वसई तालुका प्रसिद्धि प्रमुख पदी *संदेश भोईर*ची नियुक्ती..! तर रत्नागिरी गुहागर तालुका संपर्कप्रमुख पदी नयन चांदोरकर.

*११)* *विरार*: विरार मधील बरफपाडा विभागात गावठी दारूच्या भट्टयांवऱ कारवाई. 30 ते 40 भट्ट्या केल्या उध्दवस्त. हजारो लिटर रसायन आणि दारू जप्त. मुंबई,ठाणे आसपास च्या परिसरात होत होता पुरवठा.

*१२)* *विरार* : विरार मधील बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला पाचूबंदर सागरी किनारी. भाईंदर खाडीत उडी मारून आत्महत्त्या केल्याचा संशय. आत्महत्येचे कारण अस्पस्ट.

 *१३)* *नालासोपारा* : संतोष भुवन येथे 2 लाखाचा गुटखा जप्त. तुळींज पोलिसांची कारवाई.

*१४)* *भाईंदर* : काशीमीरा येथील काशी गावात 60 लाखाचा गुटखा जप्त. एक गोदाम सील आणि 5 टेम्पो जप्त.

*१५)* *वसई* : सत्पाळा येथील जी.प शाळेजवळील रस्ता 1 वर्षापासून नादुरुस्त. विद्यार्थी आणि नागरिकांचे हाल.

*१६)* *वसई* : आदित्य डोंगरे मारहाण प्रकरणी psi सुरेंद्र शिवदे आणि पोलीस नाईक निलेश राऊत यांचे निलंबन. पोलीस दलात मात्र नाराजी. आंदोलन करण्याचा इशारा.

*१७)* *वसई* : रॉकेल काळाबाजारवर  वालीव पोलिसांची कारवाई. 4,300 लिटर रॉकेल जप्त. मुंबई अहमदाबाद महामार्गावर सापळा रचून केली कारवाई.

*१८)* *वसई* : अखेर वसई अंबाडी पुलाचे उद्घाटन 25 जुन रोजी. *सकाळी ११:००* वाजल्यापासून हा सेतू वाहतूकीसाठी खुला करण्यात  येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.
*-टीम आमची वसई*

टीम *JOIN* करण्यासाठी व नियमित अपडेट्स व वसई संबंधित बातम्यांसाठी आपले पूर्ण नाव व ठिकाण 9323395598 या आमची वसईच्या Whatsapp क्रमांकावर पाठवावे.

Thursday, June 23, 2016

रेशनिंगचे नियम

*रेशनिंगचे नियम*
रॉकेल/घासलेट पहिल्‍या पंधरवड्यात न घेतल्‍यास महिना अखेरपर्यंत घेता येते. हप्‍ता बुडत नाही.
बीपीएल् व अंत्‍योदयचे धान्‍य गेल्‍या महिन्‍यात न घेतल्‍यास पुढच्‍या महिन्‍यातही घेता येते.

बीपीएल् व अंत्‍योदयचे धान्‍य महिन्‍यात 4 हप्‍त्‍यातही घेता येते.

रेशनवर घेतलेल्‍या वस्‍तूंची पावती मिळालीच पाहिजे. पावतीवर रेशन दुकानाचा क्रमांक असतो.

एका दिवशी एकच पावती फाडता येते असा नियम नाही.

ज्‍या व जेवढ्या वस्‍तू हव्‍या असतील तेवढ्याच वस्‍तू आपण घेऊ शकतो.

 इतर गोष्‍टी घेतल्‍याशिवाय रॉकेल मिळणार नाही असे दुकानदार म्‍हणू शकत नाही.

*रेशनकार्ड स्‍वतःकडे ठेवून घेण्‍याचा किंवा ते रद्द करण्‍याचा अधिकार दुकानदाराला नाही*

रेशन दुकान रोज सकाळी 4 तास व सायंकाळी 4 तास उघडे असलेच पाहिजे.

आठवडी बाजाराच्‍या दिवशी उघडे असले पाहिजे.

आठवड्यातून एकदाच दुकान बंद ठेवता येते.

*रेशन दुकानात लोकांना स्‍पष्‍टपणे वाचता येईल असा महिती फलक असला पाहिजे. या फलकावर दुकानाची वेळ, सुटीचा दिवस, दुकान क्रमांक, तक्रार वही उपलब्‍ध असल्‍याची नोंद, रेशन कार्यालयाचा पत्‍ता व फोन,भाव व देय प्रमाण, उपलब्‍ध कोटा ही माहिती असणे अनिवार्य असते*.

 बीपीएल, अंत्‍योदय व अन्‍नपूर्णा लाभार्थ्‍यांची यादी दुकानात लावलेली असते.

*वरीलपैकी कोणतीही गोष्‍ट आपल्‍या गावातल्‍या रेशनदुकानात होत नसेल, तर ताबडतोब लेखी तक्रार नोंदवा*

*दुकानातच तक्रारवही ठेवलेली असते. ती वही मागा आणि त्‍यात आपली तक्रार लिहून त्‍याखाली नाव, पत्‍ता, सही/अंगठा करा*
 *जर दुकानदाराने ही वही दिली नाही, तर तहसिलदाराकडे वही न देण्‍याची तक्रार करा*

 *तक्रारवही न देणे हा अदखलपात्र गुन्‍हा म्‍हणून तहसिलदार कारवाई करतात*

*तक्रारवहीत पाच तक्रारी नोंदल्‍या, की दुकानदाराला 15 हजार रूपये दंड होतो*

दुकानावर देखरेख करण्‍यासाठी ग्राम पंचायतीची दक्षता समिती असते. या समितीत जागरूक तरुणांनी सहभागी झाले पाहिजे.

ग्रामसभेत या समितीविषयी चर्चा करा. गरज असेल, तर समिती बदला. ही समिती दुकानावर धाड घालू शकते. गैरप्रकार असतील, तर दुकानाला टाळेही लावू शकते. तलाठी या समितीचा सदस्‍य सचिव असतो.

*लेखी तक्रार तहसिलदार किंवा रेशन ऑफिसर यांच्‍याकडेही करता येते*

प्रत्येकाने शेयर करा👍

जव्हारला पावसाची प्रतिक्षा

हुसेन मेमन,  जव्हार
तालुक्यात बहुतांश शेतकऱ्याना पाऊस नसल्यामुळे पेरण्या लांबवाव्या लागल्या आहेत. १०० % आदिवासी असलेल्या जव्हार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे पालन पोषण शेतीवर अवलंबून आहे.दरवर्षा प्रमाणे जव्हार तालुक्यात ६ ते ७ जून च्या दरम्यान पावसाने आगमन होते. त्यामुळे शेतकरी यापूर्वीच जमीनीची नांगरणी, मशागत, खते, बी-बियाणे इत्यादीची खरेदी करून पूर्ण तयारीत असतो, मात्र निर्सगाच्या लहरीपणामुळे यंदा पाऊस जून संपत आला तरी पुरेसा पडलेला नाही त्यामुळे यंदा शेती होणार की नाही? असा प्रश्न पडला आहे.
बहुतांश शेतकरी छोट्याखानी आपल्याला पुरेल इतकेच भात व नागली पिक घेत असतात आणि त्याच पिकात वर्षभर आपल्या कुटूंबाचे पालन पोषण करीत असतात, परंतू पाऊस पडत नसल्यामुळे शेतकऱ्यांना बाजारातून भाताचे बियाणे खरेदी करावे लागत आहे, त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसानही होत आहे. भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पालघर जिल्हयातील जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड तालुक्यातील शेतकऱ्यांची पावसा अभावी चिंता वाढत चाललेली आहे. वेळीच पाऊस पडत पसल्यामुळे पेरण्या लाब्ांणीवर जाणार आणि याचा दुष्परीणाम पिक काढते वेळी पडणार आहे, म्हणून शेतीची लागवड करावयाची की नाही? असा गंभीर प्रश्न छोट्या शेतकऱ्यांना पडला आहे. बहुतेक शेतकऱ्यांनी बि-बियाणे खरेदी करून ठेवलेले आहेत, परंतू पाऊस नसल्यामुळे बियाणे पडूनच आहे, महिन्या दोन महिन्यापूर्वीच भाव कमी असतांना खरेदी केलेले बियाणे इतक्या उशीरापर्यंत टिकेल की नाही अशीही शंका शेतकऱ्यांना सतावते आहे, त्यामुळे खरेदी केलेले बियाणे फुकट जाते की काय? आणि पुन्हा बियाणे खरेदी करतांना बाजारभाव चढलेला असेल तर तोही आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना बसणार आहे.

पालघर तालुक्यात १४५ मि.मी. पाऊस

पालघर तालुक्यातील एकूण सहा मंडळात आतापर्यंत सरासरी अवघा १४५.८ मि.मि. पाऊस पडला असून मागील वर्षाच्या तुुलनेत (२१ जून २०१५) ३३२.४ मि.मी. पाऊस कमी झाला आहे. आतापर्यंत अवघा चार दिवस किरकोळ पाऊस पडला असून पावसाच्या होत असलेल्या विलंबाबत शेतकरी चिंतातूर असून पेरणी करावी की नाही याबाबत संभ्रमावस्थेत आहेत.
पालघर तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे १,१७,८२४ हेक्टर असून त्यापैकी १६ हजार २२२.८४ हेक्टर क्षेत्रफळावर भातलागवड केली जात असून लागवडीच्या क्षेत्रापैकी १० टक्के नर्सरी क्षेत्र म्हणजेच भात बी पेरणी १६२२.२८ हेक्टर क्षेत्रफळावर करणे अपेक्षित आहे. मात्र मागील वर्षी (२०१५) तालुका कृषी विभागाच्या अहवालानुसार प्रत्यक्षात १५७३.६१ हेक्टर म्हणजेच ९७ टक्के भातपेरणी झाली होती.
पालघर तालुक्यातील पालघर, मनोर, बोईसर, सफाळा, आगरवाडी व तारापुर या सहा मंडळातन पर्जन्यमानाचे मोजमाप होत असून त्या नंतर तालुक्याचे सरासरी पर्जन्यामान काढले जाते मागील वर्षी ३ आॅक्टोबर २०१५ पर्यंत एकूण २०५०.२ मि.मी. पाऊस झाला होता. तर ३० जून पर्यंत ६६९.२ मि.मि. पाऊसाची नोंद झाली होती.
या वर्षाच्या पावसाळी हंगामात प्रथम पाऊस २६ मे रोजी ४.२ मि.मी. २९ मे ४.६ मि.मी. २० जून ३७.० मि.मी. व २१ जून रोजी ९५.० मि.मी. तर ८ मार्च २०१६ ०.५.० मि. मी. असा एकूण १४५.८ मि.मी. पाऊस पडला आहे. तर मागील वर्षी १२ जून २०१५ ला खऱ्या अर्थाने पाऊस पडुन दणक्यात सुरूवात केली होती.
मागील वर्षी जुन महिन्यात एकूण सोळा दिवसात ६६९.२ मि.मी. पाऊस पडला होता (१६५.१ टक्के) जुलै महिन्यात चौदा दिवसात ७२८.५ मि.मी. (३५.३ टक्के) तर सप्टेंबर महिन्यात अवघे दोन दिवस पाऊस पडून फक्त १२ मि.मी. पाऊस (४.१टक्के) झाला होता. त्यानंतर ३ आॅक्टोंबर २०१५ पर्यंत एकूण पावसाची नोंद २०१५ मि.मी. झाली होती. या वर्षी आता वरुणराजा कोणते रंग दाखवतो याकडे संपूर्ण जिल्हयातील बळीराजाचे लक्ष लागून राहिले आहे. (वार्ताहर) लोकमत

वसई विकास बॅंकेत मॅनेजर व असिस्टंट मॅनेजरपदासाठी संधी

VASAI VIKAS SAHAKARI BANK LTD.

 
A leading & fast growing Urban Co-operative Bank having Business Turnover of more than 2100 Crores, invites applications from the eligible aspirants for the post of:-
 
1) Assistant General Managers
Work Experience:
* Graduate/Post Graduate with 5 years experience in executive cadre having worked in co-operative banks preferred.
* The candidate must possess thorough knowledge of Credit, Treasury, Administration, Information Technology and Risk Management etc.
* Age below 58 years.
*Incase of retired bankers age limit not to exceed 62 years.
 
2) Manager - For Branch Operations in Mumbai, Nashik & Aurangabad
Work Experience:
* Graduate with CAIIB & 3 years experience as an Officer in Banking Industry.
* Graduates with 5 years of experience as an Officer in Banking Industry.
* Age not to exceed 50 years.
 
*Aspirants without banking experience need not apply.
VRS Optees / Retired Banking employees may also apply for above position on contract basis.
 
Interested candidates may apply with their latest Resumes mentioning expected annual salary package within 10 days to:
CHIEF EXECUTIVE OFFICER
VASAI VIKAS SAHAKARI BANK LTD (Scheduled Bank)
Head Office, Opp. Chimaji Appa Ground,
Near Vasai Depot
Vasai (W), Dist. - Palghar 401 201.
You can contact us on
Email ID- hrd@vasaivikasbank.co.in