Friday, August 11, 2017

पालघर जिल्हा योगासन निवड चाचणी २०१७

*पालघर जिल्हा योगासन निवड चाचणी २०१७*

पालघर जिल्हा योग असोसिएशन आयोजित, *जिल्हास्तरीय योगासन निवड चाचणी २०१७*, दि. १७ - ०८ - २०१७ रोजी घेण्यात येणार आहे.

सदर योगासन स्पर्धा खालील गटात होतील -
१) ८ ते ११ वर्षे मुले व मुली
२) ११ ते १४ वर्षे मुले व मुली
३) १४ ते १७ वर्षे मुले व मुली
४) १७ ते २१ वर्षे मुले व मुली
५) २१ ते २५ वर्षे मुले व मुली
६) २५ ते ३५ वर्षे पुरुष व महिला
७) ३५ ते ६० वर्षे पुरुष व महिला

*स्पर्धेची दिनांक* :-
                 १७ आॅगस्ट २०१७

*स्पर्धेची वेळ* :-
नाव नोंदणी :- सकाळी ७:३० ते ८:३०
स्पर्धा :- सकाळी ९:०० वाजता

*स्पर्धेचे ठिकाण* :-
४ था मजला, जुने वि. वा. महाविदयालय, विरार ( प )

*प्रवेश शुल्क* :- प्रत्येकी १०० रुपये

*स्पर्धेसाठी पोशाख* :-
मुले व पुरुष :- हाफ पॅंट
मुली व महिला :- योगा काॅश्च्यूम किंवा स्लॅक्स आणि टि-शर्ट
   
*स्पर्धेसंबंधी माहिती* :-
१) प्रत्येक स्पर्धकांना त्यांच्या वयोगटाच्या योगासन अभ्यासक्रमातील लाॅटरी पद्धतीने काढलेली ५ आसने करावयाची आहेत.
२) प्रत्येक स्पर्धकाने आसनाच्या अंतिम स्थितीत ३० सेकंद स्थिर राहणे आवश्यक आहे.
३) प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
४) प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या स्पर्धकांना प्राविण्य प्रमाणपत्र देण्यात येईल व हे स्पर्धक राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत पालघर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करतील

*प्रत्येक स्पर्धकाने, २ पासपोर्ट आकाराचे फोटो, शाळेचे ओळखपत्र / जन्म तारखेचा पुरावा, आधार कार्डची झेराॅक्स घेऊन येणे*

*अधिक माहिती साठी संपर्क*
सौ. रुचिता ठाकूर :- 9922134444
श्री. लाॅसन कोरिया :-
86987 10284

Thursday, August 10, 2017

भारतीय जवानांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा संपूर्ण सफाळावासीयांतर्फे सन्मान

सफाळे आणि परीसरातील गावांमधील भारतीय सेना दलामध्ये सेवा दिलेल्या आणि देत असलेल्या भारतीय जवानांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा वीरमाता अनुराधाताई गोरे यांच्या हस्ते संपूर्ण सफाळावासीयांतर्फे सन्मान होणार आहे.. या सन्मान सोहळ्यास अवश्य उपस्थित रहा..

C.H.M. शैलेश दत्ताराम ठाकूर - माकुणसार
M.TD. बजरंग विठ्ठल डिंडाळे - सफाळे
हवालदार : संजय हरीश्चंद्र लाडे - चटाळे
B.S.F. : किरण शांताराम पाटील - माकणे
C.H.M. : सुनिल नारायण सावे - वेढी
कॅप्टन : आशिष वासुदेव संखे - सफाळे
नाईक : श्री विजय रामचंद्र राऊत - सफाळे
ऑनररी कॅप्टन : श्री लक्ष्मण भिवा वर्तक - सफाळे
नायक : विशाल लक्ष्मण वर्तक - सफाळे
नायक : हर्षल अरूण पाटील - सफाळे
हवालदार : श्री सुर्यकांत शांताराम चौधरी - सफाळे
हवालदार : श्री मधुकर हरी पाटील - सफाळे
कमांडो : धिरज गोपीनाथ राऊत - उसरणी
मेजर : प्रभाकर वामन धाडीगावकर - सफाळे
हेड कॉन्स्टेबल : परशुराम वासूदेव घरत - विळंगी
भारतीय सैनिक : मिलिंद प्रभाकर पाटील - विळंगी
B.S.F.: मनोज सोमनाथ गुंड - माकणे
Late रवी जगन्नाथ साळवी - सफाळे

अभिमान बाळगा आपल्या सफाळे परीसरामधील या सर्व जवानांचा सन्मान म्हणजे आपल्या गावाचा सन्मान आहे..
या सर्व जवानांचा अंतःकरणपूर्वक सन्मान होत आहे. या सोहळ्यास अवश्य उपस्थित रहा.... !

रविवार दिनांक 13 ऑगस्ट 2017 सायंकाळी ठीक 5:00 वाजता
देवभुमी हाॅल, सफाळे पूर्व

अंतरंग सांस्कृतिक कला दर्पण प्रतिष्ठान

#अंतरंग सांस्कृतिक कला दर्पण प्रतिष्ठान, सफाळे

Tuesday, August 1, 2017

पालघर जिल्हा | १ ऑगस्ट | वर्धापनदिन

⭐पालघर जिल्हा⭐


🔮पालघर जिल्ह्याचे मुख्यशहर आहे.

🔮ठाणे शहरापासून ५२.३ किमी व महाराष्ट्राची राजधानी मुंबईपासून ७४ किमी अंतरावर आहे.

🔮सागरी-डोंगरी अन् नागरी अंग असलेल्या देशातील सर्वांत मोठ्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन, त्यामधून वेगळा झाला

🔮पालघर हा राज्यातील ३६वा जिल्हा १ ऑगस्ट२०१४ रोजी अस्तित्वात आला.

🔮विभाजनानंतर अस्तित्वात आलेल्या नव्या पालघर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १४,३५,१७८

🏁तालुके
🏰पालघर
🏰जव्हार
🏰मोखाडा
🏰तलासरी
🏰वसई
🏰विक्रमगड
🏰वाडा

❇पालघर जिल्ह्यातील
जव्हार, मोखाडा आणि तलासरी हे तीन तालुके १०० टक्के
आदिवासी बहूल आहेत
 ❇तर वसई, विक्रमगड आणि वाडा तालुक्यांत आदिवासींचा लोकसंख्या संमिश्र आहे़.

❇गडचिरोली, नंदुरबार प्रमाणेच पालघर जिल्ह्याला आदिवासी जिल्ह्याचे स्वतंत्र अस्तित्व मिळणार असल्याने त्यासाठी केंद्राकडून मिळणार्‍या कोट्यवधींच्या अनुदानामुळे पालघर परिसराचा झपाट्याने विकास होण्यास मदत होणार आहे़.

🚄🚎🚎पालघर शहर रेल्वे, रस्ते आणि समुद्र मार्गाने मुंबई आणिगुजरात राज्याशी जोडलेले आहे.

🏭मुंबई शहरापासून जवळ असल्यामुळे शैक्षणिक, औद्योगिक आणि शहरी प्रगतीस खूप वाव आहे.

🚌🚌पालघर येथून महाराष्ट्रातील उर्वरित भागासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेस आहेत.

🚍पालघर शहराभोवती असलेल्या
केळवे, माहीम,सातपाटी,
शिरगाव, तारापूर, मनोर, बहाडोली, वाडा अशा अनेक ग्रामीण भागांत जाण्यास महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेस आहेत.

⌛इतिहास

🗼100 वर्षापुर्वी पालघर हे ठाणे जिल्ह्यातील माहीम तालुक्यातील एक छोटे खेडेगाव होते.

🗼इ.स. 1893 साली हल्लीची वेस्टर्न रेल्वे म्हनजे पूर्वीची बाँम्बे बरोडा अँन्ड सेंट्रल रेल्वे B.B..&,C.I पालघरहुन गेल्यामुले पालघर स्टेशन निर्माण झाले

🗼इ.स. 1990 पासून प्लेग मलेरीयाच्या साथीमुळे व रेल्वेच्या सोयीमुळे माहिम गावातील श्रीमंत लोक पालघरला स्थायिक झाल्याने गाव वाढू लागला

🗼इ.स.1918 साली शासनाने तालुका कचेरी माहीमहुन पालघर येथे आणली.

🗼1923 साली पालघर कचेरीची हल्लीची इमारत बाधली गेली.

🗼इ.स. 1920 साली व्यंकटेश अँग्लो व्हर्नाक्युलर हायस्कूल या संस्थने शाळा काढली त्याचेच रुपांतर नंतर आर्यन हायस्कूलमधे झाले.

🗼ई.स.1923- ग्रामपंचायतीची स्थापना. पण मर्यादित लोकांना मतदान अधिकार.

🗼ई.स.1930च्या आसपास मुंबईतील म्हशी व घोडेच्या तबेल्याना पालघर येथून गवताचा पूरवठा होऊ लागला व पालघरातील शेतकरी लोकाना एक नवीन फायदेशीर धंदा मिळाला.

🗼14 आँगस्ट1942 रोजी "चलेजाव" आंदोलनात काढलेल्या मोर्चावरती गोळीबार होऊन पाच तरूण मरण पावले त्याच्या स्मरनार्थ् आजचा हुतात्मा चौक बांधला आहे.

🗼 इ.स.1948 फालनीमुले सींधी समाजाचे पालघरात आगमन झाले

🗼इ.स.1952 - सर्वाना मतदानाचा अधिकार असलेली ग्रामपंचायत.

🗼इ.स.1959 पंचायत समितीची स्थापना.

🗼इ.स.1980- पासून शासनाने सवलती दिल्यामुळेे पालघरच्या आजूबाजूला इन्ड़स्ट्रीज येणे सुरु झाले ते अजून चालु आहे.पालघरची
लोकसंख्या सतत वाढत आहे.

🗼ई.स. 1990- च्या आसपास रहिवासी निवासासाठी ईमारती बांधणे  (फ्लाट्स) मोठ्या प्रमाणावरती सुरु झाले .

🗼ई.स.1998- पालघर नगरपरिषदेची स्थापना.

🗼ई.स.2013- पासुन लोकल रेल्वे सुरु होऊन पालघरचे रुपाँतर मुंबईच्या उपनगरात झाले आहे.

🗼 ई.स.1 आँगस्ट 2014 - पालघर जिल्ह्याची स्थापना.

👤मा. मुख्यमंत्री हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्दघाटन झाले.

🌐भौगोलिक सीमा

🚄🚃मुंबईच्या पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावर विरारस्थानकाच्या पुढे पालघर हे चौथे रेल्वे स्थानक आहे.

🎓शिक्षण

🏫पालघर शहरात शालेय शिक्षणापासून उच्च शिक्षणासहित संशोधन स्तरावरील शिक्षणाची सोय आहे.

🏭औद्योगिक वसाहत

🏬पालघर शहराजवळच एक विस्तीर्ण औद्योगिक वसाहत आहे. येथे रसायने, वस्त्रप्रावरणे, अवजड यंत्रे, औषधे इत्यादींचे काही कारखाने आहेत.

✈महत्त्वाची स्थळे

🚖केळवे समुद्र किनारा
🚖लक्ष्मी नारायण मंदिर
🚖पालघर-केळवे रस्ता
🚖शिरगावचा समुद्र किनारा
🚖शीतलादेवीचे केळवे येथील पुरातन मंदिर
🚖सातपाटी समुद्र किनारा
🚖हुतात्मा स्तंभ (पाचबत्ती)
-----------------------------------------------
 http://palgharlive.com https://fb.palgharlive

Tuesday, July 11, 2017

अमरनाथ हल्ला: मृतांत पालघरच्या दोघांचा समावेशअमरनाथ हल्ला: मृतांत पालघरच्या दोघांचा समावेश
 
काश्मीरच्या अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर सोमवारीरात्री दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ७ जण ठार झाले आहेत. अनंतनागमधील बेंटेगू आणि खानबल भागात दहशतवाद्यांनी हल्ले केले. या दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्यांपैकी दोन भाविक हे महाराष्ट्रातील पालघरचे रहिवासी आहेत. जखमींमध्ये महाराष्ट्रातील ११ जणांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. या घटनेच्या निषेधार्थ विरोधकांनी आज जम्मू-काश्मीर बंदची हाक दिली आहे

अमरनाथ यात्रेवरील दहशतवादी हल्ल्यात पालघरच्या डहाणूमधील रहिवाशी निर्मलाबेन ठाकोर आणि उषा सोनकर ठार झाले आहेत. भाविकांची ही बसगुजरातच्या वलसाडमधील ओम ट्रॅव्हल्सची असून या बसच्या मालकाचा मुलगाही या हल्ल्यात जखमी झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू, रामबन, सांबा, कठूआ आणि उधमपूर येथे हायअॅलर्ट जारी करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहयांनीही आज तातडीची बैठक बोलावली असून परिस्थितीचा आढावा घेणार आहे.ज्या बसवर हल्ला करण्यात आला त्या बसची नोंदणी नव्हती अशी माहिती समोर येत आहे. अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांची आणि बसची नोंदणी केली जाते. नोंदणी केलेल्या बसला सुरक्षा पुरवली जाते. त्यामुळे दहशतवाद्यांनी याच बसला लक्ष्य केल्याचे उघडकीस आले आहे.दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केलाआहे. मात्र, भारत अशा भ्याड हल्यांपुढे आणि द्वेषमुलक कृत्यांपुढे कधीच झुकणार नाही, असा ठाम निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
- ११ जुलै २०१७ लोकसत्ता
http://palgharlive.com

थकीत शेतसाऱ्यामुळे सरकारजमा झालेल्या जमीनी परत मिळणार


थकीत शेतसाऱ्यामुळे सरकारजमा झालेल्या जमीनी परत मिळणार
राज्यातील हजारो शेतकऱ्यांना होणार फायदा, शासनालाही मिळणार महसूल
पुणे - शेतसारा न भरल्याने सरकारजमा झालेल्या आकारीपड जमिनी मूळ मालकांना परत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या जमिनी परत देताना त्यासाठी दंड आकारला जाणार आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील हजारो शेतकऱ्यांना होणार असून शासनाच्या तिजोरीतही सुमारे दिड हजार कोटी रुपयांची भर पडणार असल्याचा अंदाज आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना जमिनीची मालकी मिळणार असून त्यातून शासनालाही महसूल मिळणार आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम-182 मधील तरतूदी अनुसार कसूर करणाऱ्या व्यक्तींच्या जमीनी जप्त करुन जिल्हाधिकाऱ्यांच्या व्यवस्थापनाखाली घेतलेल्या जमिनी मूळ मालकांना अथवा त्यांच्या कायदेशीर वारसांना परत करण्यासाठीच्या नियमांचे प्रारुप शासनाने जाहीर केले आहे.
काही शेतजमीन मालकांनी शेतसारा न भरल्यामुळे त्यांच्या जमिनींच्या सातबारा सदरी आकारपड अशी नोंद करण्यात आली असून त्या जमिनीचा मालकी हक्क सरकारकडे आहे. मात्र या जमिनी मूळ मालकाकडेच ठेवण्यात आला. त्यामुळे जमिनीची मालकी सरकारची असली तरी वहिवाट मात्र शेतकऱ्याची आहे. सरकारने 1960 पासून अशा जमिनीवर मालकी हक्क लावला आहेत. या जमिनी 1980 पर्यंत सरकारकडून परत केल्या जात होत्या. त्यासाठी आकारीपड लागल्यानंतर दहा ते बारा वर्षात शेतसारा आणि नाममात्र दंड भरावा लागत होता. मात्र त्यांनतर या जमिनी परत करण्याचे काम थांबविण्यात आले. अशा प्रकारातील लाखो एकर जमिनी राज्यात असून शेतसारा अथवा आकार न भरल्यामुळे त्या जमिनीवर सरकारची मालकी कायम राहिली. 
दैनिक प्रभात, ११ जुलै २०१७

http://palgharlive.com

Saturday, July 8, 2017

१० कोटींची झाडे गेली कुठे?

*१० कोटींची झाडे गेली कुठे?*
🌴🌳🤔
खास प्रतिनिधी, वसई , लोकसत्ता | Updated: July 8, 2017
वसई-विरार महापालिका यंदा पावसाळय़ात तब्बल सव्वा दोन लाख झाडे लावणार आहेत. याच महापालिकेने गेल्या दोन वर्षांत दोन लाख ९८ हजार ४१४ झाडे लावली, त्यासाठी १० कोटींचा निधी खर्च केला. मात्र या झाडांचे पुढे काय झाले हेच पालिकेला ठावूक नाही. ही झाडे जगली की मृत झाली हा प्रश्न अनुत्तरित असताना यंदा नव्याने झाडे लावण्याचा संकल्प पालिकेने केला आहे. त्याशिवाय गेल्या वर्षी लावलेल्या ४९ हजार झाडांपैकी ७७ टक्के झाडांच्या संरक्षक जाळी बेपत्ता असल्याचेही उघडकीस आले आहे.
वसई-विरार महापालिकेले गेल्या काही वर्षांपासून वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. प्रत्येक प्रभागात पालिकेतर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठय़ा थाटामाटात सादर करून त्याला प्रसिद्धी दिली जाते. मात्र गेल्या वर्षीच्या झाडांचे काय झाले त्याबाबत पालिकेकडे ठोस माहिती नाही. २०१५ ते २०१७ या कालावधीत नऊ  प्रभागात २ लाख ९८ हजार ४१४ झाडे लावली आहेत. या झाडांसाठी पालिकेने १० कोटी ९३ लाख ६८ हजार रुपये खर्च केल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. या झाडांचे पुढे काय झाले, ती जगली का हे प्रश्न अनुत्तरीत आहे.
पालिकेने लावलेल्या झाडांना टॅग लावले जातात. मात्र पालिकेने खाजगी स्वयंसेवी संस्थांनी लावेल्या झाडांनाही आपले टॅग लावून ही आपली झाडे असल्याचे भासवले होते. झाडांच्या संवर्धनासाठी पालिका ठेका देते. त्यात झाडांना पाणी घालण्याचा ठेका दिलेला असतो. मात्र या पाण्याचाही गैरवापर होतो आणि या प्रकणात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वसई पर्यावरण संवर्धक समितीचे निमंत्रक समीर वर्तक यांनी केला आहे.
‘संरक्षक जाळी’प्रकरणी अद्याप कारवाई नाही

गेल्या वर्षी लावण्यात आलेल्या ४९ हजार झाडांपैकी ७७ टक्के झाडांच्या संरक्षक जाळय़ा बेपत्ता असल्याचे उघडकीस आले आहे. वृक्ष प्राधिकरण विभागाकडून मिळालेल्या माहितीची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पडताळणी केली असता पालिकेने सांगितलेली संरक्षक जाळय़ांची संख्या आणि प्रत्यक्षात जागेवर आढळून आलेल्या जाळय़ा यामध्ये मोठी तफावत आहे. ठेकेदार मे. हिरावती एंटरप्रायजेस या ठेकेदारास हा ठेका देण्यात आला होता. त्यांना १० कोटी ९३ लाख ६८ हजार रकमेची देयके अदा करण्यात आली आहेत. मात्र अनेक झाडे ही संरक्षक जाळी नसल्याने मृत झाली होती. अनेक झाडांच्या बाजूला जाळय़ा उन्मळून पडल्या आहेत, तर काही जाळय़ा मोडकळीस आल्या होत्या, असा आरोप शिवसेनेने केला आहे. या प्रकरणी अनेकदा तक्रारी करण्यात आल्या होत्या, पंरतु अद्याप कुठलीच कारवाई झालेली नसल्याचे शिवसेना नगरसेवक धनंजय गावडे यांनी सांगितले.

Friday, June 30, 2017

पश्चिम वसईवर जीवनसंकट

*पश्चिम वसईवर जीवनसंकट*

http://www.loksatta.com/thane-news/drinking-water-issue-in-west-vasai-1502339/

सुहास बिऱ्हाडे, वसई, लोकसत्ता | Updated: June 30, 2017 3:17 AM

पाण्यात क्षारांचे प्रमाण अधिक; पिण्यायोग्य नसल्याचा धक्कादायक निष्कर्ष

वसईच्या पश्चिम पट्टय़ातील रहिवाशांना विहिरीचे पाणी प्यावे लागत असून जवळपास सर्वच विहिरींचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा निष्कर्ष जलतपासणीनंतर काढण्यात आला आहे. गावातील ५० ठिकाणच्या पाण्याच्या नमुन्यांवर आठ तपासण्या करण्यात आल्या, त्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या पाण्यात क्षार, क्लोराइडचे प्रमाण अधिक असून ते आरोग्यास हानीकारक असून हे पाणी पिण्यायोग्य असल्याचे तपासणीनंतर पुढे आले आहे.

वसईच्या पश्चिम पट्टय़ातील रहिवाशांचा विहीर हाच एकमेव जलस्रोत आहे. गेल्या काही वर्षांपासून येथील ग्रामस्थांना विविध आजारांची लागण होत आहे. ‘पाणी वाचवा’ या मोहिमेअंतर्गत काम करत असताना ‘स्वाभिमानी वसईकर’ या संस्थेला याबाबतची माहिती मिळाली. पाण्यात वाढलेले क्षार, गढूळपणा आणि बदललेली चव त्यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे संस्थेचे कार्यकर्ते व रसायनतज्ज्ञ ऑल्विन रॉड्रिक्स यांनी पाण्याची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. एप्रिल ते जून या कालावधीत मूळगाव, रमेदीपासून बोळिंज, राजोडी, आगाशी, नंदाखाल यांच्यासह वेगवेगळ्या गावांतील विहिरींतून ५०पेक्षा जास्त पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासले. प्रत्येक पाण्याच्या नमुन्यावर ८ चाचण्या करण्यात आल्या. पाण्यात आवश्यक घटक कोणते आहेत आणि विषारी, अयोग्य घटक कोणते आहे याची धक्कादायक माहिती समोर आली. हे पाणी दूषीत असून पिण्यास अयोग्य असल्याचे तपासणीनंतर समोर आले आहे. या परिसरात रहिवासी आजारी पडण्याचे कारण हेच दूषीत पाणी असल्याचे रॉड्रिक्स यांनी सांगितले.

*इलेक्ट्रॉनिक कचरा विहिरींमध्ये*

पाण्यातील विषारी घटकांचा प्रादुर्भाव वाढत चालल्याचे या चाचण्यांवरून दिसत आहे. बावखले, तळे, वापरात नसलेल्या विहिरी मोठे खड्डे यामध्ये वापरलेले सेल (बॅटरी), मोबाइलमधील खराब झालेली बॅटरी, खराब झालेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे, रसायने टाकली जात आहेत. ते झिरपून विहिरींचे पाणी प्रदूषित होत असल्याचे रॉड्रिक्स यांनी सांगितले. हा अहवाल पालिका, प्रांत आणि विविध शासकीय यंत्रणांकडे सादर केला जाणार आहे.

*पाण्यात कोणते घटक?*

नंदाखाल, बोळिंज, नानभाट, आगाशी, उमराळे, निर्मळ, गास, भुईगाव या सर्वच गावांतील पाण्यात क्षाराचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात आढळले आहे. हे प्रमाण ब ७०० पासून १५०० ते २०० मिलिग्रॅम प्रतिलिटर आहे. मूत्रपिंडांसह शरीरातील विविध अवयवांवर, केसांवर क्षारांचे दुष्परिणाम होतात.

या पाण्याचा सामू (पीएच) ८.५ आहे. काही ठिकाणी पाण्याचा सामू ९ ते ९.५ पर्यंत असल्याचे आढळून आले. त्यांचा परिणाम शरीरातील पेशींवर होतो, त्याशिवाय कर्करोगही होऊ शकतो.

पाण्यात जंतू, माती व रसायनेही आढळली असून त्यामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे.

पाण्यात क्लोराइडचेही प्रमाण जास्त आढळून आले आहे. सामान्य मानकाप्रमाणे त्याचे प्रमाण २५० मिलिग्रॅम प्रति लिटर असणे आवश्यक आहे. मात्र बोळींज-जापके, नंदाखाल, भुईगाव या ठिकाणी क्लोराइडचे प्रमाण ३०० मिलिग्रॅम प्रति लिटर आढळले आहे. नैसर्गिकरीत्या अतिउपशामुळे खारे पाणी स्वच्छ पाण्याची जागा घेत आहे.

आगाशी, नंदाखाल, बोळिंज या ठिकाणी नायट्रेटचे प्रमाण ४५ पासून १०० मिलिग्रॅमपर्यंत प्रतिलिटर असे आढळले आहे. हा घटक जास्त प्रमाणात असल्यास लहान मुले व गर्भवती महिलांना त्याची बाधा होऊ शकते.

*लोह आणि ‘फ्लुराइड’चे प्रमाण योग्य*

पाण्यातील विषारी घटक वाढत असताना लोह आणि फ्लुराइडचे प्रमाण मात्र योग्य असल्याचे आढळून आले. पाण्यामध्ये लोहाचे प्रमाण ०.३ मिलिग्रॅम प्रति लिटर आवश्यक असते.

चाचण्यांमध्ये लोहाचे प्रमाण योग्य असल्याचे आढळून आले, तर १ मिलिग्रॅम प्रति लिटर फ्लूराइडचे प्रमाण योग्य मानले जाते, तेदेखील योग्य प्रमाणात असल्याचे रॉड्रिक्स यांनी सांगितले.